दक्षिण आफ्रिकेत रंगलेल्या १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत चारवेळच्या विजेत्या भारताला पराभवाचा धक्का देत युवा बांगलादेश संघाने क्रिकेटच्या मैदानात नवा इतिहास रचला. या ऐतिहासिक विजयात कर्णधार अकबर अलीच्या नाबाद ४३ धावांच्या खेळीचा सिंहाचा वाटा आहे. विशेष म्हणजे मोठ्या बहिणीच्या निधनाच्या दुख:त असताना त्याने न डगमगता संयमी खेळी करुन देशाला विश्व चॅम्पियन बनवण्यात मोलाचा वाटा उचलला.
आतापर्यंत गड्यालाही जमलं नाही ते या महिला क्रिकेटरनं करुन दाखवलं
अंतिम सामन्याच्या काही दिवसांपूर्वीच अकबरच्या मोठ्या बहिणीचे निधन झाले. विश्वचषक स्पर्धेत संघ चांगली कामगिरी करत असल्यामुळे कुटुंबियांनी सुरुवातीला त्याला यासंदर्भातील माहितीच दिली नाही. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापूर्वी त्याच्या भावाने मोठी बहिण गेल्याची बातमी त्याला दिली. दुख:द बातमी समजल्यानंतही त्याने संघाचे नेतृत्व कणखरपणे केले. एवढेच नाही तर संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली.
Video U-19 WC : फायनलमध्ये 'जंटलमन गेम' बदनाम!
१८ वर्षीय अकबरच्या बहिणीने २२ जानेवारी रोजी जुळ्या मुलांना जन्म दिला. प्रसुतीदरम्यानचं तिचे निधन झाले. बांगलादेशमधील प्रमुख दैनिक 'प्रथम आलो'च्या वृत्तानुसार, बहिण खदीजा खातूनच्या निधनाची बातमी अकबरला देण्यात आली नव्हती. आपल्या बहिणीवर अकबरचे जीवापाड प्रेम होते. ती देखील त्याच्यावर जीव ओवाळून टाकायची. त्यामुळे ही बातमी त्याला सांगण्याचे धाडसच झाले नाही, असे त्याच्या वडिलांनी सांगितले. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर जेव्हा त्याचा फोन आला तेव्हा भावाने त्याला घरी घडलेली दुख:द घटनेबद्दल माहिती दिली होती.
बांगलादेश U-19 वर्ल्डकपचा चॅम्पियन, भारताचा धक्कादायक पराभव
अकबरची मोठी बहिण खदीजाने १८ जानेवारी रोजी ग्रुप-सीमधील बांगलादेश विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यातील सामना टेलिव्हिजनवर पाहिला होता. या सामन्यात बांगलादेशने विजय मिळवला होता. पण आपल्या भावाच्या नेतृत्वाखाली देशाने विश्वचषक जिंकल्याचे ती पाहू शकली नाही.