पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

U19 World Cup 2020 : टीम इंडियाची घोषणा, प्रियमकडे नेतृत्वाची धूरा

प्रियम गर्ग

भारतीय क्रिकेट नियमाक मंडळाने (बीसीसीआयने) सोमवारी १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय पुरुष संघाची घोषणा केली. प्रियम गर्ग याच्याकडे भारतीय संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे. आघाडीच्या फलंदाज असलेल्या गर्गने  प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावले असून 'अ' श्रेणीमध्ये शतकी कामगिरी केली होती. नुकत्याच झालेल्या देवधर चषक स्पर्धेत गर्गने भारत सी टीमचे प्रतिनिधत्व करताना दिसला होता. अंतिम सामन्यात ७४ धावांची खेळी केली होती. 

स्मिथने डॉन ब्रॅडमनला टाकले मागे, कसोटीत सर्वांत वेगवान ७००० धावा

१९ जानेवारी ते ७ फेब्रुवारी या कालावधीत दक्षिण आफ्रिकेमध्ये १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे. पाचव्यांदा विश्वचषक उंचावण्याच्या इराद्याने भारतीय युवा संघ मैदानात उतरणार आहे. भारतीय संघ पहिल्यांदा विश्वचषकासाठी पात्र ठरलेल्या जपानसह न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यासोबत 'अ' गटात स्थान मिळाले आहे. प्रत्येक गटातील दोन संघ सुपर लीगसाठी पात्र ठरणार आहेत.  

मातृत्वानंतर सानिया मिर्झा नवी इनिंग सुरु करण्यास सज्ज

भारतीय युवा संघ : प्रियम गर्ग(कर्णधार), ध्रुव चंद झुरेल(उप-कर्णधार आणि यष्टिरक्षक), यशस्वी जयसवाल, तिलक वर्मा, दिव्यांश सक्सेना, शाश्वत रावत, दिव्यांश जोशी, शुभांग हेगडे, रवि बिश्वनोई, आकाश सिंह, कार्तिक त्यागी, अथर्व अंकोलकर, कुमार कुशाग्र (यष्टिरक्षक), सुशांत मिश्रा आणि विद्याधर पाटील.