दक्षिण आफ्रिकेमध्ये सुरु असलेल्या १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेतील सुपर लीगच्या पहिल्या क्वॉर्टर फायनलमध्ये युवा टीम इंडियाने कांगारुना पराभूत केले. या विजयासह भारतीय संघाने सेमीफायनलमध्ये धडक मारली. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यात युवा ऑस्ट्रेलियन संघाचा सलामीवीर सॅम फॅनिंग याने भारताच्या आकाश सिंहला कोपराने धक्का मारण्याचा प्रकार घडला होता. यापार्श्वभूमीवर आयसीसीने सॅमवर कठोर कारवाई केली आहे. त्याच्या खात्यात आता दोन डिमेरिट पाँइंट जमा झाले आहेत. आयसीसीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
Australia’s Sam Fanning has been found guilty of a Level 1 breach of the ICC Code of Conduct for this incident against India at the #U19CWC.
— Cricket World Cup (@cricketworldcup) January 30, 2020
More 👉 https://t.co/Viogl2NgGW pic.twitter.com/UGz3tJ8D07
VIDEO : न्यूझीलंडच्या चाहत्याकडून 'भारत माता की जय'ची घोषणा
सॅम फॅनिंगने १२७ चेंडूत ७५ धावांची खेळी केली होती. ऑस्ट्रेलियाच्या डावातील ३१ व्या षटकात आकाश सिंहच्या गोलंदाजीवर चेंडू टोलावल्यानंतर सॅमने खुन्नस दाखवण्याच्या हेतून आकाशला कोपराने धक्का दिला होता. यासंदर्भातील व्हिडिओ क्रिकेट वर्ल्डकपच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. मंगळवारी झालेल्या सामन्यादरम्यान सॅमवर आयसीसीच्या नियमावलीतील २.१२ नियमानुसार खेळाडूला चुकीच्या पद्धतीने टक्कर दिल्याबद्दल कारवाई करण्यात आली. सामन्यानंतर सॅमने आपली चुकीसह शिक्षाही मान्य केली होती.
NZ v IND 3rd T20I: कोहलीने धोनीला टाकलं मागे, नोंदवला खास विक्रम
याशिवाय याच सामन्यात ऑस्ट्रेलियन फलंदाज ओलाइव्हर डेविसने कार्तिक त्यागीसोबत स्लेजिंग करण्याचा प्रयत्न केला होता. त्यागीने तंबूचा रस्ता दाखवत त्याचे तोंड बंद केले होते. त्याला बाद केल्यानंतर त्यागीनेही आपला राग व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले होते. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजीस निमंत्रित केले होते. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने निर्धारित ५० षटकात ९ बाद २३३ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना युवा कांगारुंचा संघ ४३. ३ षटकात अवघ्या १५९ धावांत आटोपला.