पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बांगलादेश U-19 वर्ल्डकपचा चॅम्पियन, भारताचा धक्कादायक पराभव

बांगलादेश U-19 वर्ल्डकपचा चॅम्पियन, भारताचा धक्कादायक पराभव

संकटाच्या काळी कर्णधार अकबर अलीने केलेल्या संयमी खेळीच्या जोरावर बांगलादेशाने १९ वर्षाखालील विश्वचषकाचे जेतेपद पटकावले. रविवारी खेळण्यात आलेल्या अंतिम सामन्यात भारताने ३ विकेटने (डीएलएसनुसार) पराभूत करत पहिल्यांदाच किताबावर आपले नाव कोरले. बांगलादेशाने पहिल्यांदा भारताला १७७ धावांवर तंबूत परतवले. त्यानंतर इमॉन आणि कर्णधार अकबर अलीच्या भागीदारीच्या जोरावर किताब पटकावला. एकावेळी बांगलादेशचा डाव सहा विकेटवर १०२ धावा असा झाला होता. भारत बांगलादेशवर विजय मिळवेल असे वाटत असतानाच जायबंदी होऊन मैदानाबाहेर गेलेला इमॉन पुन्हा परतला आणि त्याने अकबरच्या साथीने टीमला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका निभावली. भारतीय टीमचा पाचव्यांदा अंडर-१९ विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न बांगलादेशने भंग केले.

अंडर १९ विश्वचषकात १२ सामन्यानंतर भारताचा हा पहिला पराभव ठरला. यापूर्वी भारताने २०१६ च्या अंडर-१९ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात वेस्ट इंडिजला पराभूत केले होते. 

बांगलादेशने चांगली सुरुवात केली होती. १७८ धावसंख्या मोठी नव्हती. बांगलादेशनेही गडबड केली नाही. परवेज इमॉन आणि तन्जीद हसनने पहिल्या विकेटसाठी ५० धावांची भागीदारी केली. दोघांनी भारतीय गोलंदाजांना सुरुवातील यश मिळवून दिले नाही.