न्यूझीलंड दौऱ्यातील टी-२० मालिका विजयाच्या आनंदात असलेल्या टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. सलामीवीर रोहित शर्माने एकदिवसीय आणि कसोटी मालिकेतून माघार घेतली आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या टी-२० सामन्यात रोहितला स्नायू दुखावल्यामुळे अर्ध्यातूनच मैदान सोडावे लागले होते. त्याची ही दुखापत गंभीर असल्यामुळे तो तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघासोबत नसेल. त्याच्या अनुपस्थितीत संघात कोणाला संधी मिळणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
सुपर ओव्हरमधील या 'सुपर फॅक्ट' तुम्हाला माहितीयेत का?
न्यूझीलंडविरुद्धच्या अखेरच्या कसोटी सामन्यात विराटच्या अनुपस्थिती भारतीय संघाचे नेतृत्वा करणाऱ्या रोहित शर्माने ४१ चेंडूत ६० धावांची दमदार खेळी केली होती. पण स्नायू दुखापतीमुळे त्याला रिटायर हर्ट होऊन तंबूत परतावे लागले होते. क्षेत्ररक्षणालाही तो मैदानात उतरला नव्हता. या सामन्यात लोकेश राहुलने कार्यवाहू कर्णधार म्हणून भूमिका बजावल्याचे पाहायला मिळाले होते.
जोकोव्हिचनं साम्राज्य राखलं! थीमला नमवत विक्रमी ग्रँडस्लॅमवर कब्जा
५ फेब्रुवारीपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना हेमिल्टनच्या मैदानात खेळवण्यात येणार असून दुसरा सामना ऑकलंड तर तिसरा आणि अखेरचा सामना माऊंट माउनगुईच्या मैदानात रंगेल. या मालिकेनंतर २१ ते २५ फेब्रुवारी दरम्यान पहिला कसोटी सामना नियोजित असून २९ फेब्रुवारी ते ४ मार्च या कालावधीत रंगणाऱ्या कसोटी सामन्याने भारताचा न्यूझीलंड दौरा संपेल.