पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कसोटीत सर्वाधिक शतकं झळकवणारे 'चार' सलामीवीर

कसोटीत सर्वाधिक शतके झळकवणारे सलामीवीर

क्रिकेटच्या मैदानात प्रत्येक सामन्यात काही ना काही विक्रम नोंदवले जात असतात. काही विक्रम हे अशक्यप्राय असल्याची चर्चा रंगते. तर काही विक्रम कोण मागे टाकेल याचे तर्क वितर्क क्रिकेट चाहत्यांमध्ये लावले जातात. आपण अशाच काही विक्रमांविषयी जाणून घेणार आहोत. कसोटीमध्ये संघाच्या डावाची सुरुवात करणे फार मुश्किल काम असते. नव्या चेंडूवर धावा करणे ही फलंदाजासाठी मोठी कसोटी सुनील गावसकर यांनी लीलया पेलली. नजर टाकूयात अशा चार फलंदाजावर ज्यांनी कसोटीत डावाला सुरुवात करताना सर्वाधिक शतके साजरी केली आहेत.   

सुनील गावसकर

सुनील गावसकर
भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि लिटल मास्टर सुनील गावसकर यांनी ११९ सामन्यात भारताच्या डावाला सुरुवात केली. यातील २०१३ डावात त्यांनी ५०.२९ च्या सरासरीने ९ हजाक ६०७ धावा केल्या आहेत. हा एक विक्रमच आहे. यात त्यांच्या ३३ शतकांसह ४२ अर्धशतकांचा समावेश आहे.   

कूक

अ‍ॅलेस्टर कूक
इंग्लंडच्या क्रिकेटमधील एक मोठं नाव म्हणजे अ‍ॅलेस्टर कूक. इंग्लंडकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम हा कूकच्या नावे आहे. इंग्लंडच्या डावाची सुरुवात करताना त्याने तब्बल ३१ शतके झळकावली आहेत. २७८ कसोटीमध्ये त्याच्या नावे ११ हजार ८४५ धावा आहेत. सलामीवीर म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा खास विक्रमही त्याच्याच नावे आहे.  

हेडनमॅथ्थू हेडन
ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज अशी ओळख असलेला मॅथ्यू हेडनने १०३ कसोटी सामन्यातील १८४ डावात ३० शतके झळकावली आहेत. सलामीवीर म्हणून सर्वाधिक शतके झळकवणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात करताना त्याने ५०.७३ च्या सरासरीने ८ हजार ६२५ धावा केल्या आहेत. त्यात २९ अर्धशतकांचा समावेश आहे.  

ग्रॅहम स्मिथ
ग्रॅहम स्मिथ
दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅहम स्मिथ या यादीत चौथ्या स्थानावर आहे. त्याने ११४ कसोटीतील १९६ डावात ४९.०७ च्या सरासरीने ९ हजार ३० धावा आपल्या खात्यात जमा केल्या आहेत. यात २७ शतके आणि ३६ अर्धशतकांचा समावेश आहे.