पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Cricket Record Book : पदार्पणात षटकाराने खाते उघडणारे चार धाकड गडी!

ऋषभ पंत आणि रविंद्र जडेजा

राष्ट्रीय संघात स्थान मिळवणे हे प्रत्येक क्रिकेट युवा खेळाडूचं स्वप्न असते. अनेक खेळाडूंचा प्रवास देशांतर्गत क्रिकेटमध्येच संपुष्टात होतो. काहीजण राष्ट्रीय संघात येतात आणि कधी गायब होतात ते कळतही नाही. फार मोजके खेळाडू दमदार पदार्पण करुन स्पर्धेत आपले स्थान टिकवून सातत्यापूर्ण संघासोबत राहतात. प्रत्येक खेळाडूसाठी राष्ट्रीय संघातील पदार्पणाचा सामना हा खूप महत्त्वाचा असतो. मग तो टी-२० असो एकदिवसीय सामना असो किंवा कसोटी. 

Ind Vs SL T20 : रोहितच्या एक पाऊल पुढे जाण्याची विराटला संधी

मैदानात उतरल्यानंतर प्रत्येक फलंदाजासाठी पहिली धाव खूप महत्त्वाची असते. त्यात पदार्पणाचा सामन्यात दबाव तर असतोच. पण काही क्रिकेटर्स आपल्या शैलीचा धडाका पदार्पणाच्या सामन्यातच दाखवून देतात. आज आपण नजर टाकूया अशाच चार धडाकेबाज फलंदाजांवर ज्यांनी पदार्पणातील सामन्यात षटकाराने खाते उघडले अशा फलंदाजांवर...
 झेवियर मार्शल (वेस्ट इंडिज)

झेवियर मार्शल (वेस्ट इंडिज)
विंडीजचा धाकड फलंदाज झेवियर मार्शल याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात ही टी-२० सामन्याने केली. २० जून २००८ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याला संघात संधी मिळाली. आपल्या पदार्पणाच्या सामन्यात त्याने ब्रेटलीच्या पहिल्याच चेंडूवर षटकार खेचून खाते उघडले. या सामन्यात त्याने १५ चेंडूत ३६ धावा केल्या होत्या. यात ३ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. वॉटसनने क्षेत्ररक्षणातील चपळाई दाखवत त्याला धावबाद करुन तंबूत धाडले होते. या सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभवाचा सामना करावा लागला होता.  
युसूफ पठाण

युसूफ पठाण (भारत)
युसूफ पठाण भारताचा एकमेव फलंदाज आहे ज्याला टी-२० विश्वचषकात पदार्पणाची संधी मिळाली. सलामीवीर विरेंद्र सेहवाग जखमी असल्यामुळे टीम इलेव्हनमध्ये संधी मिळालेल्या युसूफने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात गौतम गंभीरच्या साथीनं भारताच्या डावाला सुरुवात केली होती. डावातील मोहम्मद असिफच्या चौथ्या चेंडूवर युसूफ पठाणने षटकार खेचत खाते उघडले होते. या सामन्यात त्याने ८ चेंडूत १५ धावा केल्या होत्या. भारतीय संघाने हा सामना ५ धावांनी जिंकला होता.  

#मार्क क्रेग (न्यूझीलंड)

#मार्क क्रेग (न्यूझीलंड)
न्यूझीलंड संघाचा अष्टपैलू खेळाडू मार्क क्रेगने कसोटी पदार्पणाच्या सामन्यात षटकाराने खाते उघडण्याचा पराक्रम केला होता. ८ जून २०१४ मध्ये त्याने विंडीज विरुद्धच्या सामन्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. या सामन्यातील दुसऱ्या डावात त्याला फलंदाजी करण्याची संधी मिळाली. त्याने षटकार खेचत कारकिर्दीला सुरुवात केली. या सामन्यात त्याने २ चेंडूत केवळ ७ धावा केल्या. न्यूझीलंडने हा सामना १८६ धावांनी जिंकला होता.  
रिषभ पंत आणि रविंद्र जडेजा
# ऋषभ पंत (भारत)
कसोटी पदार्पणाच्या सामन्यात युवा ऋषभ पंतने षटकाराने खाते उघडण्याचा पराक्रम केला होता. १८ ऑगस्ट २०१८ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात त्याने कसोटी संघात पदार्पण केले. या सामन्यात त्याने ५१ चेंडूत १ षटकार आणि २ चौकाराच्या मदतीने २४ धावांची खेळी साकारली होती. टीम इंडियाने हा सामना २०३ धावांनी जिंकला होता.