पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

टोकियो ऑलिम्पिकचे नवे वेळापत्रक जाहीर

ऑलिम्पिकचे नवे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

जगभरात कोरोना विषाणूने घातलेल्या थैमानामुळे अनेक खेळ स्थगित करण्याची वेळ आली. जगातील मानाची स्पर्धा असणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेवरही कोरोनामुळे संकट निर्माण झाले. वाढत्या दहशतीच्या पार्श्वभूमीर स्पर्धा पुढील वर्षी घेण्याचा निर्णय ऑलिम्पिक संघटनेने घेतला होता.नव्या वेळापत्रकानुसार, पुढील वर्षी २३ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान टोकियामध्ये ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. कोरोनामुळे स्पर्धा एक वर्ष स्थगित करण्याची घोषणा करण्यात आल्यानंतर सोमवारी स्पर्धेची तारिख निश्चित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. 

मितालीकडून १० लाखांची मदत, संकटाचा सामना करण्यासाठी साथ देण्याचे

जगभरात कोरोनाचे संकट निर्माण झाले असताना जपान आणि ऑलिम्पिक संघटना स्पर्धा स्थगित करण्यासाठी सुरुतीला राजी नव्हते. स्पर्धा नियोजित वेळेनुसार घ्यावी, असाच त्यांचा विचार होता. पण कॅनडाने सर्व प्रथम टोकाची भूमिका घेत स्पर्धेतून माघार घेतली. त्यानंतर अन्य काही राष्टांनी सहभाग घेण्यास नकार दिला. परिणामी आयोजकांना आणि ऑलिम्पिक संघटनेला स्पर्धा पुढे ढकलण्याचा पर्याय निवडावा लागला. ऑलिम्पिकसोबतच पॅरा ऑलिम्पिक स्पर्धाही स्थगित करण्यात आली असून ही स्पर्धा २४ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर दरम्यान खेळवण्यात येणार आहे. 

लॉकडाऊन: लेकीला व्यग्र ठेवण्यासाठी हॉकीपटूने लढवली शक्कल! पाहा VIDEO

कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया यांनी स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर अमेरिका, ब्रिटन आणि न्यूजीलंड या राष्ट्रांनी देखील ऑलिम्पिक स्पर्धा स्थगित करण्यावर भर दिला होता. सध्याच्या परिस्थितीत स्पर्धेसाठी कोणतीही तडजोड करु नये, अशी भूमिका या राष्ट्रांनी घेतली होती. जगभरातून या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या जवळपास ६८ टक्के खेळाडूंनी स्पर्धा सध्याच्या घडीला घेऊ नये, अशी भूमिका मांडली होती.