पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ओपन चॅलेंज देणाऱ्या झरीनच्या ऑलिम्पक स्वप्नाचा मेरी कोमकडून चक्काचुरा

मेरी कोमला ऑलिम्पिक तिकीट

ऑलिम्पिक पात्रता निवड चाचणीतील बहुचर्चित लढतीमध्ये सहावेळची जागतिक विजेती एम. सी. मेरी कोम हिने जागतिक बॉक्सिंग स्पर्धेतील माजी कनिष्ठ विजेती निखत झरीनला पराभूत केले. या विजयासह मेरी कोमचा ऑलिम्पिक पात्रतेसाठी तिकीट मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दुसरीकडे या पराभवामुळे झरीनचा ऑलिम्पिकमध्ये खेळण्याच्या स्वप्नाचा चक्काचुरा झाला आहे. महिला बॉक्सिंगच्या ५१ किलो वजनी गटातील अंतिम फेरीत शनिवारी मेरी कोमने झरीनला ९-१ अशा फरकाने पराभूत केले आहे. 

दोन दिवसांच्या निवड चाचणीतील पहिल्या दिवशी निखत झरीनने राष्ट्रीय विजेच्या ज्योती गुलियाला १०-० अशा फरकाने पराभूत करत अंतिम फेरी गाठली होती. तर मेरी कोमने रितू ग्रेवालला १०-० असे एकहाती पराभूत करत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती.     

विस्डेनच्या टॉप ५ क्रिकेटर्समध्ये विराट कोहली

जागतिक कनिष्ठ स्पर्धेची माजी विजेती निखत झरीन हिने टोकिया ऑलिम्पिकसाठी बॉक्सिंग खेळाडूंची निवड चाचणी निपक्षपाती व्हावी, अशी इच्छा व्यक्त केली होती. यासाठी ऑलिम्पिक निवड चाचणीवेळीच्या लढतींचे थेट प्रेक्षपण दाखवावे, अशी मागणी तिने राष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाकडे केली होती. तिने या भूमिकेतून बॉक्सिंग महासंघाच्या ऑलिम्पिक पात्रतेच्या निवड प्रक्रियेवर संशय व्यक्त केला होता.

बॉक्सिंग: 'सुपर मॉम'विरुद्ध भिडण्याची भाषा करणाऱ्या झरीनची नवी मागणी

तिच्या या भूमिकेची क्रीड वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती. मेरी कोमसोबतच्या लढतीमध्ये ती कशी कामगिरी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. झरीनसह क्रीडा चाहत्यांमध्ये या लढतीची उत्सुकता निर्माण झाली होती. फायनली मेरी कोमने बाजी मारत टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्रता सिद्ध करण्याच्या दृष्टिने आपली आगेकूच सुरु ठेवली आहे.