पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शोएब अख्तर म्हणतो, भारतीयांना पाकिस्तानशी युद्ध नकोय...

शोएब अख्तर

भारतीयांना पाकिस्तानी नागरिकांसोबत अजिबात दुश्मनी नकोय... भारतीय हे कायम अभ्यागतांच्या स्वागतासाठी तयार असतात... भारत हा खरंच छान देश आहे... ही विधाने आहेत पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याची. एका चॅट शोमध्ये त्याने भारतीयांचे तोंडभरून कौतुक केले.

कोरोनामुळे दक्षता, तुळजाभवानीचे मंदिर ३१ मार्चपर्यंत बंद राहणार

तो म्हणाला, भारत हा उत्कृष्ट देश आहे. या देशातील नागरिकही छान आहेत. मला कधीही असे वाटले नाही की भारतीयांना पाकिस्तानशी युद्ध करायचे आहे. फक्त मी टीव्ही कार्यक्रमात गेल्यावर असे वाटते की दोन्ही देशांमध्ये उद्याच युद्ध होईल. मी भारतात मोठ्या प्रमाणात फिरलो आहे. या देशाला खूप जवळून बघितले आहे. त्यामुळेच मी हे सांगू शकतो की पाकिस्तानसोबत काम करण्यात भारतीय नागरिक उत्सुक आहेत. पाकिस्तानमधूनच भारताच्या यशाचा मार्ग जातो असे माझे ठाम मत झाले आहे.

आता विश्वासदर्शक ठरावासाठी भाजपची सुप्रीम कोर्टात धाव

सध्याच्या कोरोना विषाणूच्या उद्रेकामुळे यावेळी आयपीएल होण्याची शक्यता कमी आहे. त्याचबरोबर यामुळे भारताचे मोठे नुकसान होऊ शकते, असेही शोएब अख्तरने म्हटले आहे. कोरोनामुळे सध्या जे काही सुरू आहे ते दुर्दैवी आहे, असेही त्याने म्हटले आहे. कोरोना विषाणूच्या जगभरातील संक्रमणाबद्दल त्याने तीव्र चिंताही व्यक्त केली.