पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

टीम इंडियासाठी BCCI ला हवा असा कोच!

रवी शास्त्रींनाही नव्याने अर्ज करावा लागणार

भारतीय क्रिकेट मंडळाने (बीसीसीआय) मंगळवारी पुरुष संघाच्या मुख्य प्रशिक्षिक पदासह अन्य स्टाफमधील इतर पदांसाठी अर्ज मागवले आहेत. मुख्य प्रशिक्षकपदासाठी वयोमर्यादा ६० वर्षांपेक्षा कमी असावी, तसेच  आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रशिक्षणाचा दोन वर्षे अनुभव असावा, अशी पात्रता आवश्यक असल्याचा उल्लेख बीसीसीआयने केला आहे.

सहाय्यक स्टाफमध्ये फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षकांसोबतच फिजिओथेरिपिस्टची नियुक्ती करण्यात येणार आहे. सर्व पदांसाठी ३० जूलै पर्यंत अर्ज करता येतील. यापूर्वी जुलै २०१७ मध्ये भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी शात्रींच्या नियुक्तीवेळी बीसीसीआयने पात्रता निकषाबाबत अधिक स्पष्टता दिली नव्हती. मात्र यावेळी बीसीसीआयने पदासंदर्भातील माहिती स्पष्टपणे दिली.

IND vs WI: विंडीज दौऱ्यावर 'या' नव्या चेहऱ्यांना मिळेल संधी 

सध्याच्या घडीला टीमसोबत असणाऱ्या सर्वांना नव्याने होणाऱ्या प्रक्रियेसाठी अर्ज करता येतील, असेही बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. मुख्य प्रशिक्षक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला कसोटी दर्जा असलेल्या संघासोबत प्रशिक्षक म्हणून किमान दोन वर्षांचा अनुभव असावा. किंवा असोसिएट सदस्य/अ टीम/ आयपीएलमध्ये तीन वर्षांचा अनुभव अनिवार्य आहे.
या सोबतच अर्जदाराने ३० कसोटी आणि ५० एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले असावेत.

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींना नव्याने अर्ज करावा लागणार

फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक पदी अर्ज करण्यासाठी मुख्य प्रशिक्षकाप्रमाणेच पात्रता आवश्यक आहे. या पदासाठी १० कसोटी आणि २५ एकदिवसीय सामन्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधीत्व करणारे उमेदवार पात्र ठरतील.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: these quality require to be the head coach of team india bcci release application for new coach