पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सचिन नव्हे धोनी क्रिकेटमधील देव! ट्विटरवर #ThankYouDhoni ट्रेंड

महेंद्रसिंह धोनी आणि सचिन तेंडुलकर (सोशल मीडियावरील व्हायरल फोटो)

भारतीय क्रिकेट मंडळाने गुरुवारी खेळाडूंसोबतचा वार्षिक करार जाहीर केला. या यादीत माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नावाचा समावेश करण्यात आलेला नाही. धोनी बीसीसीआयसोबत करारबद्ध नसल्यामुळे त्याच्या निवृत्तीच्या चर्चेला पुन्हा उधाण आले आहे. बीसीसीआयने जारी केलेल्या खेळाडूंच्या करारानंतर सोशल मीडियावर #ThankYouDhoni ट्रेंड होत आहे. 

ब्लॉग: फिलिंग धोनी तेव्हाच आउट झालाय, जेव्हा तो धावबाद झाला!

बीसीसीआयच्या या निर्णयानंतर धोनी निवृत्तीचा विचार बोलून दाखवणार का? अशी चर्चा सोशल मीडियावर रंगताना दिसत आहे. बीसीसीआयने यासंदर्भात कोणतीही भूमिका स्पष्ट केली नसून धोनीने देखील यावर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र सोशल मीडियावर धोनीच्या कामगिरीचा दाखला देत क्रिकेटमधील योगदानाबद्दल त्याचे आभार मानण्यास नेटकऱ्यांनी सुरुवात केली आहे. #ThankYouDhoni ट्रेंडच्या माध्यमातून क्रिकेट चाहते धोनीविषयीच्या आपल्या भावना व्यक्त करत आहेत.  

BCCI च्या करारातून धोनी आउट! कोहली, रोहित अन् बुमराह A+ श्रेणीत

धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पहिला टी-२० विश्वचषक जिंकला होता. एवढेच नाही तर २०११ मध्ये धोनीच्याच नेतृत्वाखालील संघाने सचिनचे विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा सदस्य होण्याचे स्वप्न पूर्ण केले होते. आपल्या संघाला आयसीसीच्या सर्व मोठ्या स्पर्धा  जिंकून देणारा धोनी हा एकमेव कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने टी-२० आणि मर्यादीत षटकांच्या विश्वचषकासोबतच मिनीवर्ल्ड कप म्हणून ओळखली जाणारी आयसीसी ट्रॉफी देखील जिंकली आहे.

धोनीच्या कामगिरीचा उल्लेख करत धोनीच क्रिकेटच्या मैदानातील देव आहे, अशा भावनाही नेटकरी व्यक्त करत आहेत. एका नेटकऱ्याने सचिन तेंडुलकर महान आहे पण धोनीच क्रिकेटच्या मैदानातील देव आहे, अशी भावना व्यक्त केली आहे. विक्रमादित्य सचिनला क्रिकेटच्या मैदानातील देवाची उपमा दिली जाते. मात्र ही उपमा धोनीला योग्य वाटते, अशा आशयाच्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. 
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: thankyoudhoni trend on twitter after bcci exclude ms dhoni in central contract list netizens says dhoni is god of cricket not sachin Tendulkar