पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोर्टवरील बॉल गर्लला 'हॉट' म्हटल्याने पंचावर बंदीची कारवाई

खेळाच्या मैदानावरील गैरवर्तनाबद्दल पंचावर कारवाई

इटलीमध्ये पुरुषांच्या टेनिस स्पर्धेदरम्यान 'बॉल गर्ल'ला हॉट म्हणणाऱ्या पंचाची हकालपट्टी करण्यात आली आहे.  एटीपीने याबाबत माहिती दिली. पंच जियानलुका मासकोरेला यांनी मागील आठवड्यात इटलीच्या फ्लोरेन्समध्ये सुरु असलेल्या पुरुष स्पर्धेदरम्यान कोर्टवर केलेल्या गैरवर्तनाची सध्या चांगलीच चर्चा सुरु आहे. घटनेची चौकशी सुरु आहे. 

जर्सी ब्लू असो वा व्हाइट रोहित 'हिट'च : भज्जी

पंच मोसकारेला यांनी सामन्यादरम्यान कोर्टवर बॉल गर्लसाठी कार्यरत असलेल्या तरुणीला सेक्सी असे संबोधले होते. एवढ्यावरच न थांबता या तरुणीला शारिरिक किंवा मानसिकरित्या तू हॉट आहेस का? असा प्रश्नही त्यांनी केला होता. यासंबंधीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. याप्रकरणात कोर्टवरील गैरवर्तन केल्याच्या आरोपाखाली पंचावर बंदीची कारवाई करण्यात आली आहे.   

गांधी-मंडेला स्मृती चषक : रोहितच्या शतकासह भारताचे नाबाद द्विशतक

कोर्टवर पेड्रो सोसा आणि एनरिको डेल्ला वाल्ले यांच्यात सुरु असलेल्या सामन्यादरम्यान ही घडली होती. एटीपीने दिलेल्या माहितीनुसार, मागील आठवड्यात कोर्टवर घडलेला प्रकार आमच्यापर्यंत पोहचला आहे. घटनेची माहिती मिळताच आम्ही पंचाची हकालपट्टी केलीआहे. संपूर्ण घटनेची चौकशी सुरु असून यासंदर्भात योग्य ती कारवाई केली जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.