पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

घरी बसून कपडे, टॉयलेट धुतोय शिखर धवन, शेअर केला मजेशीर Video

शिखर धवननं शेअर केला मजेशीर व्हिडिओ

टीम इंडियाचा स्टार बॅटमन  शिखर धवननं  सोशल मीडियावर  एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे. जो सध्या क्रिकेटप्रेमींमध्ये तुफान व्हायरल होत आहे. कोरोना विषाणूमुळे जगभरातील सर्व खेळाचे सामने रद्द झाले आहेत. तसेच या विषाणूचा फैलाव वाढू नये म्हणून संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. सगळ्याच लोकांना घरी राहण्याचं आवाहन केलं गेलं आहे. त्यामुळे एक आठवडा घरी राहिल्यानं काय होतं, याचा एक गंमतीशीर व्हिडिओ शिखरनं शेअर केला आहे. 

अखेर ऑलिम्पिक स्पर्धा वर्षभरासाठी स्थगित

या व्हिडिओत शिखर घरातील कपडे धुताना आणि बाथरुमची साफसफाई करताना दिसत आहे. शिखरची पत्नी आयशा त्याला काम नीट करण्यासाठी ओरडतानाही दिसत आहे. एरव्ही क्रिकेट मॅचेसमुळे आपल्या  कुटुंबीयांपासून दूर असलेले हे खेळाडू लॉकडाऊनमुळे घरातच वेळ व्यतीत करत आहेत.

शिखरच्या या व्हिडिओवर ऑस्ट्रेलियाचा खेळाडू डेव्हिड वॉर्नरनही प्रतिक्रिया दिली आहे. 

कोरोना: गंभीर यांच्याकडून आर्थिक तर पठाण बंधूंकडून दान-धर्माची मदत