पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

INDvsWI : हिटमॅन रोहितनं मोडला जयसूर्याचा २२ वर्षांपूर्वीचा विक्रम

रोहित शर्मा

भारताचा सलामीवीर रोहित शर्माने कटकच्या मैदानात सुरु असलेल्या विंडीजविरूद्धच्या तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात आणखी एक विक्रम आपल्या नावे केला. विंडीजने दिलेल्या ३१६ धावांचा पाठलाग करण्यासाठी रोहित शर्मा-लोकेश राहुल या जोडीने  भारताच्या डावाची सुरुवात केली. या सामन्यात ९ धावांचा टप्पा पार करताच त्याने श्रीलंकेच्या सनथ जयसूर्या याचा २२ वर्षे अबाधित असलेला विक्रम मोडित काढला. सलग दोन चौकारानंतर एकेरी धाव घेत त्याने जयसूर्याचा कँलेंडर वर्षात सर्वाधिक धावांचा विक्रम मागे टाकला. जयसूर्याने १९९७ मध्ये  २ हजार ३८७ धावा केल्या होत्या. रोहितने यंदाच्या कँलेंडर इयरमध्ये एकदिवसीयमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा पराक्रम करत जयसूर्याच्या क्रिकेटच्या सर्व प्रकारातील सलामीवीर म्हणून सर्वाधिक धावांच्या विक्रमाला गवसणी घातली.   

विक्रमादित्य सचिनने दिला 'त्या' वेदनादायी आठवणींना उजाळा

यंदाच्या वर्षात रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत सर्वाधिक धावा करण्याचा पराक्रम केला आहे. दुसऱ्या क्रमांकावर विंडीजचा शाय होप आहे. रोहितने कसोटीमध्ये ५५६ तर टी-२० सामन्यात ३९६ धावा केल्या आहेत. वेस्ट इंडिजने मालिकेतील तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात टीम इंडियासमोर विजयासाठी ३१६ धावांचे आव्हान ठेवले आहे. कर्णधार किरॉन पोलार्ड आणि मधल्या फळीतील निकोलस पूरनच्या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर विंडीजच्या संघाने निर्धारित ५० षटकात ५ बाद ३१५ धावांपर्यंत मजल मारली.

INDvsWI : रविवारच्या दिवशी पराभवाचा 'चौकार' रोखण्याचं आव्हान

विंडीज विरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील चेन्नईच्या मैदानात रोहित शर्मा अवघ्या ३६ धावांवर बाद झाला होता. त्यानंतर विशाखापट्टणमच्या मैदानात त्याने १५९ धावांची आश्वासक आणि मॅच विनिंग खेळी केली होती. कटकचे मैदान मारुन विंडीज विरुद्धच्या द्विपक्षीय मालिकेत भारताला विक्रमी विजय मिळवण्याची संधी आहे. जर भारताने विंडीजचे आव्हान परतवले तर विडींजविरुद्धच्या द्विपक्षीय मालिकेतील भारतीय संघाचा हा सलग दहावा मालिका विजय ठरले.