पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भारतीय संघाबद्दल शोएब अख्तर म्हणाला की,...

शोएब अख्तर

बांगलादेश विरुद्धच्या टी-२० मालिकेतील विजयानंतर पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरने भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. दिल्लीच्या मैदानातील पहिल्या सामन्यातील पराभवानंतर मालिकेत कमबॅक करत भारताने नागपूरच्या मैदानावर बांगलादेशला नमवत तीन सामन्यांची टी-२० मालिका २-१ अशी खिशात घातली. भारताच्या या विजयाने अख्तरही भारावून गेला आहे.  

INDvBAN: डे-नाइट टेस्टची वेळ ठरली!

अख्तरने आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव केलाय. भारतीय संघाने क्रिकेटच्या मैदानात एक वेगळी उंची गाठली आहे. त्यामुळे मालिकेत पिछाडीवर असतानाही त्यांनी कमबॅक करत मालिका जिंकली, असे अख्तरने म्हटले आहे. 

पिंक बॉलवर खेळणे सोपे नसेल : अजिंक्य रहाणे

भारताच्या मालिका विजयाचे श्रेय त्याने कर्णधार रोहित शर्माच्या दमदार फंलदाजीला दिले आहे. रोहित हा प्रतिभावंत खेळाडू आहे, असेही त्याने म्हटले आहे. पहिल्या दोन सामन्यातील निकालानंतर तिसरा आणि अखेरचा सामना रोमहर्षक होईल, असे वाटले होते. पण भारताने सामन्यात एकहाती विजय मिळवत क्रिकेटच्या मैदानातील आपण बॉस असल्याचे सिद्ध केले, असे अख्तरने म्हटले आहे.