पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शास्त्रींच्या पॅकेजमध्ये वाढ, आता विराटपेक्षाही अधिक वेतन मिळणार

विराट कोहली आणि रवी शास्त्री

भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी पुन्हा एकदा रवी शास्त्री यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बीसीसीआयसोबतच्या नव्या करारामध्ये शास्त्री यांच्या वेतनामध्ये भरघोस वाढ होणार असल्याचे वृत्त आहे. 'मुंबई मिरर' ने दिलेल्या वृत्तानुसार,  रवी शास्त्री यांच्या वेतनामध्ये पूर्वीपेक्षा २० टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट मंडळाने देखील त्यांच्या वेतनवाढीवर शिक्कामोर्तब केल्याचे समजते.

'शेर-ए-बांग्ला ढेर' अफगाणचा कसोटीत 'शानदार' विजय

नव्या वेतननिश्चितीमध्ये शास्त्री यांना वर्षाला ९.५ ते १० कोटी रुपये इतके वेतन मिळणार आहे. यापूर्वी त्यांना प्रतिवर्ष ८ कोटी रुपये दिले जात होते. त्यांच्यासोबतच सहाय्यक स्टाफच्या वेतनामध्ये देखील वाढ होणार असून गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांना वर्षाला ३.५ कोटी रुपये दिले जातील. एवढेच वेतन क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांना दिली जाणार आहे. टीम इंडियाचे नवे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांचे वेतन २.५ ते ३ कोटींच्या दरम्यान असेल. १ सप्टेंबरपासून नवे करार लागू झाला आहे.  

'रड्या' म्हणूनच स्मिथ लक्षात राहिल! माजी गोलंदाजाचा बाउन्सर

विशेष म्हणजे रवि शास्त्री यांच्यासाठी बीसीसीआय भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीपेक्षाही अधिक वेतन देणार आहे. बीसीसीआय करारानुसार, कोहलीला वर्षाला ७ कोटी रुपये मिळतात. शास्त्री पुढील दोन वर्षे भारतीय संघासोबत असतील.   
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: team india head coach ravi shastri set to get a massive salary hike in new bcci contract