पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी भारताचा प्रमुख गोलंदाज दुखापतग्रस्त

इशांत शर्मा

न्यूझीलंड दौऱ्यावरील कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी घोषणा होण्यापूर्वी टीम इंडियासाठी धक्का देणारे वृत्त समोर आले आहे. भारतीय संघाचा अनुभवी गोलंदाज इशांत शर्मा रणजी सामन्यादरम्यान दुखापतग्रस्त झाला आहे. रणजी स्पर्धेतील विदर्भविरुद्धच्या सामन्यात दिल्लीकडून खेळताना त्याला दुखापत झाली आहे. इशांत शर्माची दुखापत कितपत गंभीर आहे, याबाबतची स्पष्टता अद्याप समोर आलेली नाही. जर त्याची दुखापत गंभीर असेल तर भारताच्या न्यूझीलंड दौऱ्यावरील डोकेदुखी वाढण्याची संकेत आहेत. दुखापतीनंतर स्टाफ सहकार्यांनी त्याला मैदानाबाहेर नेल्याचे पाहायला मिळाले. 

INDvsAUS: या तीन कारणामुळे कांगारुंची शिकार शक्य झाली!

विदर्भ संघाच्या दुसऱ्या डावातील पाचव्या षटकात इशांत शर्मा दुखापतग्रस्त झाला. प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार फैज फजल याने टोलवलेला चेंडू अडवण्याच्या नादात त्याचा तोल गेल्याने तो जमीनीवर पडला. इशांतने पहिल्या डावात ४५ धावा खर्च करत विदर्भाच्या ३ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला.  न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेसाठी इशांत शर्माची भारतीय संघात वर्णी लागणार हे जवळपास पक्के होते. त्यामुळे इशांतचा रणजी हंगामातील हा अखेरचा सामना मानला जात होता. 

रोहितच्या फटकेबाजीनं अख्तरला आठवली सचिनने दिलेली वेदनादायी जखम

दुखापत गंभीर असेल तर त्याला बंगळुरुस्थित राष्ट्रीय अकादमीत निरिक्षणासाठी जावे लागू शकते.  बीसीसीआयने याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर ५ सामन्यांची टी-२० मालिका, ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि २ कसोटी सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. न्यूझीलंडच्या खेळपट्टीवर जलदगती गोलंदाज भारतीय ताफ्यातील एक प्रमुख अस्त्र ठरु शकतो. त्याची दुखापत गंभीर असेल, तर भारतीय संघाच्या अडचणी वाढू शकतात.  
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:team india fast bowler Ishant Sharma injured during match walked out of the stadium with the help of staff ranji trophy 2020