पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

टीम इंडियाचा अष्टपैलू इरफान पठाणची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

इरफान पठाण

टीम इंडियाचा अष्टपैलू इरफान पठाणने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. इरफान पठाणने टीम इंडियाकडून २९ कसोटी, १२० वनडे आणि २४ टी २० सामने खेळले. त्याने २९ कसोटी सामन्यात १०० विकेट घेतल्या. ५९ धावात ७ विकेट ही त्याची सर्वोत्तम खेळी होती. त्याने एका कसोटीत १२६ धावा देत १२ विकेटही घेतल्या आहेत.

भारत विरुद्ध श्रीलंका : स्टेडियममध्ये बॅनर, पोस्टर नेण्यास प्रतिबंध

त्याने १२० वनडेमध्ये १७३ विकेट घेतल्या. २७ धावात ५ विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. त्याने २४ टी २० मध्ये २८ विकेट घेतल्या १६ धावांत ३ विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. 

Ind Vs SL T20 : गुवाहाटीमध्ये दाखल होताच बुमराह मैदानात, पाहा व्हिडिओ

त्याने कसोटीत १२ डिसेंबर २००३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात पदार्पण केले होते. भारताकडून त्याने अखेरचा कसोटी सामना ५ एप्रिल २००८ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरोधात खेळला. तर ९ जानेवारी २००४ मध्ये त्याने वनडेत पदार्पण केले होते. अखेरचा वनडे त्याने ४ ऑगस्ट २०१२ मध्ये श्रीलंकेविरोधात खेळला होता. टीम इंडियाकडून त्याने पहिला टी २० सामना एक डिसेंबर २००६ रोजी दक्षिण आफ्रिकेविरोधात तर अखेरचा सामना २ ऑक्टोबर २०१२ रोजी द. आफ्रिकेविरोधातच खेळला होता. 

प्रतिस्पर्धी ताफ्याला निकामी करण्यासाठी आफ्रिकेची 'स्टेनगन' सज्ज