पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Video : इंग्लंडच्या महिला क्रिकेटरकडून स्मिथची 'नक्कल'

इंग्लंडच्या महिला क्रिकेटरचा हा व्हिडिओ होतोय व्हायरल

अ‍ॅशेस कसोटी मालिकेत दमदार कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधणाऱ्या स्टिव्ह स्मिथच्या चेंडू सोडण्याची शैली  सध्या चांगलीच लोकप्रिय ठरताना दिसते. इंग्लंड विरुद्ध लॉर्डसच्या मैदानात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात स्मिथच्या चेंडू सोडण्याचा अंदाज लक्षवेधी ठरला. इंग्लंड माऱ्याला थोपवत दुसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात त्याने ९२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. या खेळीत त्याने सावध पवित्रा दाखवून देतानात मजेशीर अंदाजात चेंडू यष्टिरक्षकाकडे सोडले. त्याचा हा अंदाजाने इंग्लंड महिला क्रिकेटरला चांगलाच भावल्याचे दिसते.  

इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघातील टॅमी ब्यूमोंटने स्मिथची नक्कल केल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये टॅमी ऑस्ट्रिलियन फलंदाज आपली शक्कल लढवून स्मिथची नक्कल करताना दिसते. डेनियल वॅटने स्मिथची नकल करणाऱ्या टॅमीचा व्हिडिओ शेअर केला आहे. यापूर्वी इंग्लंडची क्रिकेटर  एलेक्स हार्टलीने स्मिथची नकल करणारा एक व्हिडिओ शेअर केला होता.

उल्लेखनिय आहे की, चेंडू कुरतडल्याच्या आरोपात दोषी आढळल्यानंतर स्मिथ जोमाने खेळताना दिसत आहे. पहिल्या कसोटीतील दोन्ही डावात त्याने शतकी खेळी करुन ऑस्ट्रिलियाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. दुसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात ८० धावांवर खेळत असताना इंग्लंडचा युवा गोलंदाज जोफ्रा आर्चरचा एक उसळता चेंडू स्मिथच्या मानेवर लागल्याची घटना घडली होती. यानंतर काही काळ त्याला मैदान सोडावे लागले. त्यानंतर मैदानात उतरल्यानंतर तो सलग तिसऱ्या शतकासाठी ८ धावांची गरज असताना बाद झाला होता.  

 

VIDEO: आर्चरचा १५० किमी वेगाने येणाऱ्या चेंडूने घेतला स्मिथच्या डोक्याचा वेध