पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तिसऱ्यांदा हुकली पूनम यादवची हॅटट्रिक!

पूनम यादव

महिला टी-२० विश्वचषकातील सलामीच्या सामन्यात पूनम यादवच्या फिरकीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाला १७ धावांनी पराभूत केले. या सामन्यात पूनम यादवने ४ षटकात १९ धावा खर्च करत चार विकेटस घेतल्या. या सामन्यात ती तिला हॅटट्रिकची संधी मिळाली होती. मात्र यष्टिरक्षक तानिया भाटियाने झेल सोडल्याने तिची हॅटट्रिक हुकली.  

Women T20 WC : भारतीय महिलांची विजयी सलामी

पूनमने रोचेल हायनेस आणि ऑस्ट्रेलियाची ऑलराउंडर एलिसा पेरीला पाठोपाठ बाद केला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या जेस जोनासेनला चकवा देण्यात पूनम यशस्वी ठरली. मात्र बॅटची कड घेऊन यष्टिमागे आलेला चेंडूचा तानियाला अंदाज घेता आला नाही. हा झेल सुटल्यामुळे पूनमची हॅटट्रिक हुकली. सामन्यातील दमदार कामगिरीमुळे तिला प्लॅयर ऑफ द मॅच म्हणून गौरवण्यात आले. यावेळी तिने हॅटट्रिकसंदर्भातील किस्सा शेअर केला. तिसऱ्यांदा माझी हॅटट्रिकची संधी हुकली आहे, असे तिने सांगितले.

NZvsIND Day 1: पृथ्वी, मयांक, पुजारा अन् विराटचा फ्लॉप शो!

दुखापतीनंतर पुन्हा कमबॅक करणे सोपे नसते. दुखापतीच्या काळात फिजिओ आणि संघातील इतर मंडळींनी मला चांगली साथ दिली. त्यामुळे मी त्या सर्वांची आभारी आहे, अशी भावना तिने व्यक्त केली. मी यापूर्वीही ऑस्ट्रेलियात चांगली गोलंदाजी केली होती. कामगिरीतील सातत्य कायम ठेवायचे हेच डोक्यात ठेवून मैदानात उतरले होते, असेही पूनमने सांगितले. भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रित कौर म्हणाली की, दिवसेंदिवस संघाची कामगिरी सुधारत आहे. या खेळपट्टीवर आमच्या बाजूने निकाल लागेल असे वाटत होते. प्रथम फलंदाजी करताना १४० पर्यंत पोहचणे आमचे लक्ष्य होते, असेही ती म्हणाली. 

NZvsIND Day 1: पृथ्वी, मयांक, पुजारा अन् विराटचा फ्लॉप शो!