पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गेलच्या महाबली विक्रमापर्यंत पोहचणे 'मुश्किलच'

ख्रिस गेल

वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलने टी-२० क्रिकेटमध्ये मोठा पल्ला गाठला आहे. त्याने केलला पराक्रमाची पुनरावृत्ती आगामी काळात कदाचित कोणताही फलंदाज करु शकणार नाही असाच आहे. कॅरेबियन प्रीमियर लीग (सीपीएल) मध्ये जमेका तलाहवाजकडून खेळणाऱ्या गेलने बारबाडोस ट्रिडेंट्सविरुद्धच्या सामन्यात २२ धावांची खेळी करताच आपल्या नावे अनोख्या विक्रमाची नोंद केली.

धोनीबद्दल चेन्नई सुपर किंग्जच्या मालकांनी स्पष्ट केली भूमिका

टी २० क्रिकेट मध्ये त्याने  १३ हजार धावांचा टप्पा पार केला. असा पराक्रम करणारा तो पहिला फलंदाज आहे. 
आतापर्यंत टी-२० क्रिकेटमध्ये त्याने ३८९ सामन्यात ३९.०७ च्या सरासरी आणि १४७.५५ च्या स्ट्राइक रेटने १३ हजार १३ धावा केल्या आहेत. टी-२० मध्ये सर्वाधिक शतके नोंदवण्याचा विक्रमही गेलच्या नावेच आहे.

PKL : नवीन कुमारची 'दबंग' कामगिरी! दिल्लीचा आणखी विजय

सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत गेलनंतर न्यूझीलंडचा ब्रेंडम मॅक्युलम दुसऱ्या स्थानावर आहेत. मॅक्युलमच्या नावे ९ हजार ९२२ धावा जमा आहेत. गेलच्या विक्रमी खेळीसह जमेका तलाहवाजने बारबाडोस ट्रिडेंट्सचा चार गडी राखून पराभूत केले.