पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

टी-१० लीग : अभिनेत्री सनी लिओनी या संघाची ब्रँड अँबेसिडर

सनी लिओनी

अबूधाबी टी-१० लीगसाठी दिल्ली बुल्स संघाने तिसऱ्या हंगामासाठी आपल्या संघाच्या जर्सीचे अनावरण केले. यासोबतच बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी हिला संघाच्या ब्रँड अँबेसिडर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. दुबईत झालेल्या कार्यक्रमात संघाचे मालक निलेश भटनागर, सनी लिओनी यांच्यासह पाकिस्तानचा माजी क्रिकेटर आणि संघाचा उपकर्णधार शोएब मलिक देखील उपस्थित होता. 

गावाकडच्या आठवणी सांगत अजिंक्य म्हणाला, शेतकरीच रिअल हिरो

दिल्ली बुल्स संघाची जर्सी ऑरेंज रंगाची असून त्यावर रॉयल ब्लू शेड असल्याचे दिसून येते. १५ ते २४ नोव्हेंबर दरम्यान दुबईमध्ये टी-१० लीगचा थरार रंगणार आहे. इंग्लंडच्या संघाला विश्वविजेतपद मिळवून देणारा कर्णधार इयोन मॉर्गन दिल्ली बुल्सचे नेतृत्व करताना दिसणार आहे. ऑस्ट्रेलियन स्टार शेन वॉटसन, वेस्ट इंडिजचा आंद्रे रसेल, श्रीलंकेचा मलिंगा आणि भारताचा माजी जलदगती गोलंदाज झहीर खान यांचा दिल्लीच्या ताफ्यात समावेश आहे.  

विराटनं १५ वर्षांचा असताना 'स्वत:ला' लिहिलेलं पत्र सोशल मीडियावर व्हायरल

दिल्ली बुल्स संघाच्या ब्रँड अँबेसिडरपदी नियुक्तीनंतर सनी म्हणाली की, यासंघासोबत जोडले गेल्याचा मला खून आनंद झाला आहे. ऑरेंज जर्सीतील संघ चांगली कामगिरी करेल, असा विश्वासही तिने व्यक्त केला. उपकर्णधार शोएब मलिक म्हणाला की, दिल्लीच्या संघाचा हिस्सा असल्याने खूप आनंदीत झालो आहे. संघासाठी उत्तम योगदान देण्यास प्रयत्न करेन. 
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: t10 league 2019 delhi bulls unveil sunny leone as official brand ambassador launch its new jersey and anthem