पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

टी-२० विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर; भारत-पाक वेगवेगळ्या गटात

टी-२० विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर; भारत-पाक वेगवेगळ्या गटात

इंग्लंडमध्ये झालेली १२ वी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा रविवारी संपुष्टात आली. अत्यंत रोमहर्षक ठरलेल्या या सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडचा पराभव केला. आता क्रिकेट चाहत्यांना पुढील वर्षी होणाऱ्या सातव्या टी-२० विश्वचषक २०२० चे वेध लागले आहेत. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या स्पर्धेचे वेळापत्रकही प्रसिद्ध करण्यात आले आहे. पाच आठवडे चालणारी ही स्पर्धा १८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर २०२० या कालावधीत पार पडेल. गत चॅम्पियन श्रीलंका आणि बांगलादेश यांची क्रमवारी कमी असल्याकारणाने टी-२० विश्वचषक सुपर १२ साठी थेट पात्र ठरण्यात अयशस्वी ठरले आहेत. त्यांना आता २०२० मध्ये होणाऱ्या या मालिकेत जागा मिळवण्यासाठी साखळी टप्प्यातील स्पर्धेत सहभाग घ्यावा लागेल.

सचिन तेंडुलकरच्या 'वर्ल्ड कपXI'मध्ये धोनी नाही

आयसीसी सुपर १२ साठी थेट पात्र ठरणाऱ्या संघांची घोषणा यापूर्वीच करण्यात आली आहे. यामध्ये अव्वल स्थानी असणाऱ्या पाकिस्तान, भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, वेस्टइंडिज आणि अफगाणिस्तान यांचा समावेश आहे. परंतु, माजी चॅम्पियन आणि आणि तीन वेळा उपविजेता ठरलेल्या श्रीलंका आणि बांगलादेशला पात्रता फेरीतील सामने खेळून या विश्वचषकाला पात्र ठरता येईल. 

CWC 2019: सर्वाधिक धावा करत रोहित शर्मा ठरला 'गोल्डन बॅट'चा मानकरी

आयसीसी २०२० टी-२० विश्वचषकाचे वेळापत्रक

ऑक्टोबर २४- ऑस्ट्रेलिया vs पाकिस्तान (सिडनी क्रिकेट ग्राऊंड)
ऑक्टोबर २४- भारत vs दक्षिण आफ्रिका (पर्थ स्टेडिअम)
ऑक्टोबर २५- न्यूझीलंड vs वेस्टइंडिज (मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड)
ऑक्टोबर २५- क्वालिफायर १ vs क्वालिफायर २ (बेलेरिव्ह ओव्हल)
ऑक्टोबर २६- अफगाणिस्तान vs क्वालिफायर ए २ (पर्थ स्टेडिअम)
ऑक्टोबर २७- इंग्लंड vs क्वालिफायर बी १ (पर्थ स्टेडिअम)
ऑक्टोबर २७- न्यूझीलंड vs क्वालिफायर बी २ (बेलेरिव्ह ओव्हल)
ऑक्टोबर २८- अफगाणिस्तान vs क्वालिफायर बी १ (पर्थ स्टेडिअम)
ऑक्टोबर २८- ऑस्ट्रेलिया vs वेस्टइंडीज (पर्थ स्टेडियम)
ऑक्टोबर २९- भारत vs क्वालिफायर ए १ (मेलबर्न क्रिकेट ग्राउंड)
ऑक्टोबर २९- पाकिस्तान vs क्वालिफायर ए १ (सिडनी क्रिकेट ग्राउंड)
ऑक्टोबर ३०- इंग्लंड vs दक्षिण अफ्रिका (सिडनी क्रिकेट ग्राउंड)
ऑक्टोबर ३०- वेस्टइंडीज vs क्वालिफायर बी १ (पर्थ स्टेडियम)
ऑक्टोबर ३१- पाकिस्तान vs न्यूजीलंड (गाबा)
ऑक्टोबर ३१- ऑस्ट्रेलिया vs क्वालिफायर ए १ (गाबा)
नोव्हेंबर १-   भारत vs इंग्लंड (मेलबर्न क्रिकेट ग्राउंड)
नोव्हेंबर १-   दक्षिण अफ्रिका vs अफगानिस्तान (एडिलेड ओवल)
नोव्हेंबर २-   क्वालिफायर ए १ vs क्वालिफायर बी 1 (सिडनी क्रिकेट ग्राउंड)
नोव्हेंबर २-   न्यूजीलंड vs क्वालिफायर ए १ (गाबा)
नोव्हेंबर ३-   पाकिस्तान vs वेस्टइंडीज (एडिलेड ओव्हल)
नोव्हेंबर ३-   ऑस्ट्रेलिया vs क्वालिफायर बी २ (एडिलेड ओव्हल)
नोव्हेंबर ४-   इंग्लंड vs अफगाणिस्तान (गाबा)
नोव्हेंबर ५-   दक्षिण अफ्रिका vs क्वालिफायर ए २ (एडिलेड ओव्हल)
नोव्हेंबर ५-   भारत vs क्वालिफायर बी १ (एडिलेड ओव्हल)
नोव्हेंबर ६-   पाकिस्तान vs क्वालिफायर बी २ (मेलबर्न क्रिकेट ग्राउंड)
नोव्हेंबर ६-   ऑस्ट्रेलिया vs न्यूजीलंड (मेलबर्न क्रिकेट ग्राउंड)
नोव्हेंबर ७-   वेस्टइंडीज vs क्वालिफायर ए १ (मेलबर्न क्रिकेट ग्राउंड)
नोव्हेंबर ७-   इंग्लंड vs क्वालिफायर ए २ (एडिलेड ओवल)
नोव्हेंबर ८-   दक्षिण अफ्रिका vs क्वालिफायर बी १ (सिडनी क्रिकेट ग्राउंड)
नोव्हेंबर ८-   भारत vs अफगाणिस्तान (सिडनी क्रिकेट ग्राउंड)

भारत फायनलमध्ये नसल्यानं स्टार स्पोर्ट्सला कोट्यवधींचा फटका

सेमीफायनल
नोव्हेंबर ११ – पहिली सेमीफायनल (सिडनी क्रिकेट ग्राउंड)
नोव्हेंबर १२ – दुसरी सेमीफायनल (एडिलेड ओव्हल)

फायनल 
नोव्हेंबर १५ – फायनल (मेलबर्न क्रिकेट ग्राउंड)