भारताचा अष्टपैलू क्रिकेटर सुरेश रैनाची पत्नी प्रियांकाने सोमवारी सकाळी मुलाला जन्म दिला. या जोडीला ग्रेसिया नावाची चार वर्षांची मुलगी असून त्याचे हे दुसरे अपत्य आहे. या गोड बातमीनंतर फिरकीपटू हरभजनसह चेन्नई सुपर किंग्जने रैनाला शुभेच्छा दिल्या आहेत.
भीतीलाही उत्सवाचं रुप दिल्यानंतर असंच होणार - संजय राऊत
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्व क्रिकेट स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. २९ मार्चपासून सुरु होणारी आयपीएल स्पर्धाही पुढे ढकलण्यात आली आहे. १५ एप्रिलनंतर यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व क्रिकेटर्स आपल्या कुटुंबियांसोबत आहेत.
सुरेश रैना आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचे प्रतिनिधीत्व करतो. चेन्नई सुपर किंग्जच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन सुरेश रैना, प्रियांका आणि ग्रेसिया यांचा फोटो शेअर करत अभिनंदन केले. तर हरभजन सिंगनेही सोशल मीडियाच्या माध्यमातून संघ सहकाऱ्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
डॉक्टरांवर हात उचलणाऱ्यांना आता कळलं असेल- राज ठाकरे
बोरिया मजूमदार यांनी आपल्या अधिकृत अकाउंटवर रैनाच्या घरी नवा पाहुणा आल्याची माहिती दिली होती. प्रियांका आणि नवजात बाळ स्वस्थ आहे, असा उल्लेख त्यांनी आपल्या ट्विटमध्ये केला होता.