बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी सध्या अबू धाबी येथे सुरु असलेल्या टी-२० लीगमध्ये दिल्ली बुल्स संघाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. यास्पर्धेदरम्यान मैदानातील एका हटके अंदाजातील व्हिडिओमुळे ती चर्चेत आहे. दिल्ली बुल्सच्या जर्सीमध्ये फुटबॉल खेळतानाचा एक व्हिडिओ तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केला आहे. या व्हिडिओला चांगलीच पसंती मिळत असून हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.
हे फक्त रोहितलाच जमेलं, धमाकेदार खेळीनंतर वॉर्नरने केली भविष्यवाणी
सनीने फुटबॉल खेळत असताना जो व्हिडिओ शेअर केलाय त्याला तिने एक खास कॅप्शन दिलय. 'What's my name.. what's my name?' तुमचा इन्स्टा अकाउंट कोणत्या नावाने आहे. तुम्ही भारतीय आहात काय? असे तिला कोणी तरी विचारत असल्याचे व्हिडिओमध्ये ऐकायला मिळते.
U19 World Cup 2020 : टीम इंडियाची घोषणा, प्रियमकडे नेतृत्वाची धूरा
३८ वर्षीय सनी लिओनी खेळाचा मनमुराद आनंद घेताना पाहायला मिळते. दिल्ली बुल्स संघाने अबू धाबी टी10 लीगमध्ये सनी लिओनीला आपल्या संघाची ब्रॅंड अँबेसिडर(राजदुत) म्हणून नियुक्त केले आहे. स्पर्धेतील प्रत्येक सामन्यात ती संघाला प्रोत्साहन देण्यासाठी मैदानात दिसली आहे. इंग्लंडला विश्वचषक मिळवून देणारा कर्णधार इयोन मॉर्गन दिल्ली बुल्सचे नेतृत्व करत आहे. याशिव. शोएब मलिक, मोहम्मद नबी यांच्यासह झहीर खान देखील या दिल्लीच्या ताफ्यातून खेळताना दिसत आहे.