आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये सुनील कुमारने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. त्याने मंगळवारी ८७ किलो वजनी गटात किर्गिस्तानच्या अजात लालिदिनोव याला ५-० असे पराभूत करत सुवर्ण पदक जिंकले. या स्पर्धेत ग्रीको रोमन गटात २७ वर्षानंतर भारतीय मल्लाने सुवर्ण कामगिरी केली आहे. दिल्लीतील के.डी. जाधव इंडोर स्टेडियममध्ये रंगलेल्या लढतीत सुनील कुमारने एकतर्फी विजय नोंदवत सुवर्ण कमाई केली.
IPL 2020 :यंदा स्पर्धेत या नव्या गोष्टी पाहायला मिळणार!
यापूर्वी सेमीफायनलच्या लढतीत सुनील कुमारला चांगलाच संघर्ष करावा लागला होता. कझाकिस्तानच्या अजामत कुस्तुबायेव विरुद्धच्या लढतीत १-८ असे पिछाडीवर असताना त्याने सलग ११ गुण मिळवत सामना जिंकून अंतिम फेरी गाठली होती. त्याच्याशिवाय अर्जुन हलाकुर्की याने ग्रीको रोमनमधील ५५ किलो वजनी गटात कांस्य पदकाची कमाई केली. वरिष्ठ गटातील खेळात अर्जुनचे हे पहिले सुवर्ण आहे. सेमीफायनलमध्ये अर्जुनने इराणच्या नासिरपोरविरुद्ध ७-१ अशी आघाडी घेतली होती. पण त्याला ७-८ अशा फरकाने पराभव स्वीकारावा लागला.
'सन ऑफ मिस्टर रिलायबल' समितचे दोन महिन्यांच्या आता दुसरे द्विशतक!
भारताकडून ७७ किलो वजनी गटातील प्रबळ दावेदार समजल्या जाणाऱ्या साजनच्या पदरी निराशा आली. त्याली किर्गिजस्तानच्या रेनत इलियाजुलूने पहिल्याच फेरीत ६-९ असे पराभूत केले. दुसरीकडे ६३ किलो वजनी गटातही भारताला निराशा आली. भारताच्या सचिन राणालाला क्वार्टर फायनलमध्ये उज्बेकिस्तानच्या एलमुरात तासमुरादोव याने ८-० असे पराभूत केले.