पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

BCCI निवड समितीच्या अध्यक्षपदी सुनील जोशींची वर्णी

सुनील जोशी

भारताच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या निवड समितीच्या अध्यक्षपदी माजी क्रिकेटपटू सुनील जोशी यांची निवड करण्यात आली आहे. जोशी विद्यामान निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद यांची जागा घेतली. बीसीसीआयच्या दोन रिक्त जागेच्या पदासाठी    माजी फिरकीपटू लक्ष्मण शिवरामनकृष्णन, राजेश चौहान, हरिंद्रर सिंह, वेंकटेश प्रसाद आणि सुनील जोशी या पाच जणांच्या मुंबईत मुलाखती झाल्या. सुनील जोशींच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली. 

सोळावं वरीस मोक्याचं! शेफालीनं तोऱ्यात

आगामी १२  मार्चपासून भारत दौऱ्यावर असणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची निवडही सुनील जोशी यांच्या अध्यक्षतेखाली होईल. जोशी यांनी भारताकडून १५ कसोटी आणि ६९ एकदिवसीय सामने खेळले आहेत. कसोटीत त्यांनी ४१ तर एकदिवसीय सामन्यात ६९ बळी घेतले आहेत.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Sunil Joshi named selection committee chairman and Harvinder added to panel bcci selection committee bcci selection committee 2020