पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

धोनीच्या 'कमबॅक' संभ्रमावर गावसकरांचा 'स्ट्रेट ड्राइव्ह'

गावसकर आणि धोनी

लिटल मास्टर आणि भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी महेंद्रसिंह धोनीविषयी मोठे विधान केले आहे. विश्वचषकापासून धोनी क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. इतका वेळ क्रिकेटपासून दूर राहण्यासंदर्भात धोनीने स्वत:ला प्रश्न विचारायला हवा, असे गावसकर यांनी म्हटले आहे. लाल बहादूर शास्त्री मेमोरियलमधील एका कार्यक्रमानंतर त्यांनी धोनीच्या न खेळण्याबाबत भाष्य केले. 

महाराष्ट्र केसरी पै. हर्षवर्धननं घेतली CM उद्धव ठाकरेंची भेट

गावसकर म्हणाले की, धोनीच्या फिटनेसबाबत काहीच सांगता येणार नाही. फिटनेसबद्दल त्याने स्वत:ला प्रश्न विचारायला पाहिजे. १० जूलैपासून त्याने स्वत:ला क्रिकेटपासून दूर ठेवले आहे. यावर विचार करण्याची गरज आहे. इतका काळ एखादा खेळाडू मैदानापासून दूर राहू शकतो का? असा प्रश्न उपस्थितीत करत धोनीच्या विश्रांतीवर त्यांनी भाष्य केले. धोनीशिवाय त्यांनी रणजी स्पर्धेतील खेळाडूंचे मानधन वाढवण्याची गरज असल्याचेही बोलून दाखवले.  

...म्हणून क्रिकेट चाहते बीसीसीआयसह विराटवरही संतापले

विश्वचषकातील न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यानंतर धोनी मैदानात दिसलेला नाही. भारतीय संघाने वेस्ट इंडीज दौरा केला त्यावेळी धोनीला विश्रांती देण्यात आल्याचे सांगण्यात आले. धोनी काही काळासाठी उपलब्ध राहणार नाही, अशी माहितीही त्यावेळी बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी दिली होती. अद्यापही धोनी संघाबाहेरच आहे. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी धोनी टी-२० मध्ये खेळत राहील अन् वनडेतून निवृत्त होईल, असा अंदाज व्यक्त केला होता.

कांगारुंच्या शिकारीसाठी या ११ वाघांना मिळू शकते संधी

त्यांच्या या वक्तव्यामुळे धोनीला ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी टी-२० विश्वचषकात संधी मिळण्याचे संकेत शास्त्री यांनी दिले होते. भारतीय संघात पुन्हा यायचे असेल तर सर्वप्रथम त्याला क्रिकेटच्या मैदानात उतरावे लागेल. सध्याचा त्याचा मूड पाहता तो आयपीएलच्या वेळीच मैदानात उतरणार असल्याचे संकेत मिळतात.