पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

स्टीव्हच्या चेहऱ्यावर पुन्हा 'कॅप्टन्सी'चं स्मित हास्य दिसणार

स्टीव्ह स्मिथ

दक्षिण आफ्रिकेतील कसोटी सामन्यात बॉल टॅम्परिंगनंतर गमावलेला नेतृत्वाचा रुबाब स्टीव्ह स्मिथला पुन्हा मिळालाय. ऑस्ट्रेलियन संघाने त्याच्याकडे नेतृत्वाची जबाबदारी देण्याच धाडस केलं नसलं तरी इंग्लंडमध्ये रंगणाऱ्या 'हंड्रेड' नावाच्या स्पर्धेत स्मिथ वेल्स फायरचे नेतृत्व करताना दिसणार आहे. बॉल टॅम्परिंगच्या प्रकरणानंतर एक वर्षाच्या बंदीसह स्मिथला ऑस्ट्रेलियाच्या नेतृत्वाची धूरा सोडावी लागली होती. एवढेच नाही तर आयपीएलमधील राजस्थान रॉयल्सनेही त्याच्याकडून नेतृत्वाची जबाबदारी काढून घेतली होती.  

टीम इंडियाचा 'गेम प्लॅन' समजण्यापलिकडचा : कपिल देव

आगामी स्पर्धेत स्मिथ आस्ट्रेलियन जलदगती गोलंदाज मिशेल स्टार्क, विश्वविजेत्या इंग्लंडच्या संघातील सदस्य जॉनी बेयरस्ट्रो आणि लियाम प्लंकेट, उद्योत्मुख स्टार टॉम बँटन आणि वेस्टइंडीजचा जलदगती गोलंदाज रवी रामपाल या खेळाडूंनी भरलेल्या ताफ्याचे नेतृत्व करताना दिसणार आहे.   

...म्हणून या क्रिकेटर्संची ट्रम्प यांच्या विरोधात शाब्दिक फटकेबाजी

हंड्रेडच्या पहिल्या हंगानात वेल्स फायरच्या नेतृत्वाची जबाबादारी मिळणे सन्मानाची गोष्ट आहे. आमचा संघ मजबूत असून स्पर्धेत चांगली कामगिरी करण्यास आम्ही उत्सुक आहोत. संघातील काही खेळाडूंनी स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर दबदबा आपली छाप उमटवली आहे. त्यांच्या जोरावर आम्ही निश्चितच लक्षवेधी कामगिरी करु, असा विश्वास स्मिथने बोलून दाखवला आहे. वेल्सच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी ही गॅरी कर्स्टन यांच्याकडे आहे.