Ashes 2019, England vs Australia, 1st Test Day 1: इंग्लंडविरुद्ध १४४ धावांची खेळी खेळत ऑस्ट्रेलियासाठी पहिल्या अॅशेस कसोटीत पहिल्याच दिवशी स्टिव्ह स्मिथने सन्मानजनक धावसंख्या उभा करुन दिली आहे. शतक केल्यानंतर स्मिथ भावुक झाला. एक वर्षांच्या बंदीच्या काळात आपल्याला अनेक वेळा निवृत्तीचा विचार आला होता, असे स्मिथने म्हटले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी त्याच्यावर बंदी घालण्यात आली होती. बंदी कालावधी संपल्यानंतर तो पहिलीच कसोटी खेळत आहे.
'क्रिकइन्फो'ने स्मिथच्या हवाल्याने म्हटले की, मागील १५ महिन्यांत अनेक वेळा मी पुन्हा क्रिकेट खेळू शकू की नाही, असे वाटत होते. एक वेळ अशी आली होती की, यासाठी मी माझे प्रेमही गमावले होते. विशेषतः त्यावेळी जेव्हा माझ्या कोपऱ्याची शस्त्रक्रिया झाली होती. त्यादिवशी माझ्या कोपऱ्याचे टाके काढण्यात आले होते. मला त्यावेळी पुन्हा प्रेम मिळाले. हे एखाद्या ट्रिगरप्रमाणे होते. त्याने मला पुन्हा मैदानात जाण्यासाठी तयार आहे का, असा सवाल केला. मला खेळायचे होते.
अॅशेस मालिका : इंग्लिश चाहत्यांनी केलं डेव्हिड वॉर्नरला लक्ष्य
Steve Smith on the moment that sent 'shivers down his spine' on day one at Edgbaston #Ashes pic.twitter.com/E3kY4XRdzS
— cricket.com.au (@cricketcomau) August 1, 2019
स्मिथने एजबस्टन मैदानावर सुरु असलेल्या या सामन्यात आपल्या कारकीर्दीतील २४ वे शतक झळकावले. तो म्हणाला, यापूर्वी माझ्या मनात अशी भावना कधीच नव्हती. माझे खेळावर जास्त प्रेम नव्हते. पण हे खूप कमी कालावधीसाठी होते. नशिबाने ते प्रेम परत आले. मी ऑस्ट्रेलियाकडून पुन्हा खेळत आहे आणि मला जे आवडते ते मी करत आहे, मी यासाठी खूप आभारी आहे.
दरम्यान, स्मिथने करिअरमधील हे शतक सर्वोत्कृष्ट असल्याचे म्हटले आहे. माझ्या सर्वाधिक चांगल्या शतकापैकी हे एक शतक आहे. सकाळी चेंडू चांगलाच वळत होता. त्यामुळे मला खूप मेहनत करावी लागली.