पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

VIDEO: आर्चरचा १५० किमी वेगाने येणाऱ्या चेंडूने घेतला स्मिथच्या डोक्याचा वेध

आर्चरचा १५० किमी वेगाने येणाऱ्या चेंडूने घेतला स्मिथच्या डोक्याचा वेध

प्रचंड फॉर्मात असलेला ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टीव्ह स्मिथ अ‍ॅशेस कसोटी मालिकेतील दुसऱ्या कसोटीत पुन्हा एकदा इंग्लंडसाठी डोकेदुखी ठरला आहे. त्याने पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला लाजिरवाणे होण्यापासून वाचवले आहे. पण या प्रयत्नात स्मिथ इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरचा १५० किमी वेगाने येणाऱ्या बाऊन्सरमुळे जायबंदी झाला आहे.

अजिंक्य रहाणेनंतर सचिन तेंडुलकर पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आला धावून

ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील ७७ वे षटक जोफ्रा आर्चर टाकत होता. त्यावेळी सुमारे १५० किमी वेगाने येणाऱ्या चेंडूचा स्मिथला अंदाज आला नाही. चेंडू सोडून देण्यापूर्वीच तो अत्यंत वेगाने उसळी घेत त्याच्या हेल्मेटवर जाऊन आदळला. शॉर्ट पीचवरील चेंडूच्या लाईनवरून बाजूला होण्यास स्मिथला वेळ लागला आणि चेंडू थेट त्याच्या हेल्मेटच्या खालच्या भागाला लागला. त्यामुळे त्याला दुखापत झाली. स्मिथ खूप वेळ मैदानावर पडून होता. त्याच्या नाकातूनही रक्त येत होते. 

हार्दिक आणि क्रुणालने खरेदी केली महागडी 'लॅम्बॉर्गिनी'

संघाच्या विजयाची मदार असलेल्या स्मिथला ८० धावांवर रिटायर्ड हर्ट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. त्याने यादरम्यान अर्धशतकी खेळी करून संघाच्या धावसंख्येला गती दिली. त्याच्याकडून ऑस्ट्रेलिया संघाला मोठ्या खेळीची आशा होती. कारण, त्याची सलामीच्या कसोटीत ऑस्ट्रेलिया संघाच्या विजयात मोलाची भुमिका राहिली आहे. त्याने या सलामीच्या कसोटीत सलग दोन्ही डावात शतक ठोकले होते.

विंडीजविरुद्धच्या सराव सामन्यात पुजाराचे शतक, रोहितचीही 'फिफ्टी'

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Steve Smith hit by Jofra Archer bouncer and leave the field at England vs Australia Lords Test in Ashes 2019