पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Ashes 2019 : स्मिथ-ख्वाजा जोडीच्या नावे लाजिरवाण्या विक्रमाची नोंद

स्मिथ-ख्वाजा

अ‍ॅशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियन उस्मान ख्वाजा आणि स्टिव्ह स्मिथ यांच्या नावे एका नकोशा विक्रमाची नोंद झाली. कॅमरुन बॅनक्रॉफ्ट बाद झाल्यानंतर स्मिथ मैदानात उतरला. दुसऱ्या बाजूला उस्मान ख्वाजा ३६ धावांवर खेळत होता. स्मिथ मैदानात येताच उस्मान ख्वाजाने मैदान सोडले. 

VIDEO: आर्चरचा १५० किमी वेगाने येणाऱ्या चेंडूने घेतला स्मिथच्या डोक्याचा वेध

या दोघांच्यात एकाही धावेची भागीदारी झाली नाही. क्रिकेटच्या मैदानात पाचव्यांदा ही जोडी खातेही उघडू शकली नाही. यापूर्वी १९६१ मध्ये कॉलिन काउड्रे आणि टेड डेक्स्टर जोडीला तिसऱ्या विकेटसाठी खातेही उघडता आले नव्हते. ५८ वर्षानंतर पहिल्यांदा नकोशा विक्रम असणाऱ्या फलंदाजांच्या यादीत उस्मान ख्वाजा आणि स्टिव्ह स्मिथच्या नावाचा समावेश झाला. 

दीपा मलिक, बजरंग पुनियाला खेलरत्न तर रवींद्र जडेजाला अर्जुन पुरस्कार

स्मिथकडे अ‍ॅशेस मालिकेतील सलग तिसरे शतक झळकवण्याची संधी होती. मात्र, त्याचे शतक अवघ्या ८ धावांनी हुकले. तो ९२ धावा करुन तंबूत परतला. इंग्लंडचा पहिला डाव २५८ धावात आटोपल्यानंतर स्मिथच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात २५० धावांपर्यंत मजल मारता आली. अल्पशा ८ धावांच्या आघाडीनंतर इंग्लंडने आपल्या दुसऱ्या डावाला सुरुवात केली आहे. ते ऑस्ट्रेलियासमोर किती धावांचे आव्हान ठेवणार हे पाहणे महत्त्वपूर्ण ठरेल.