पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'बॉल टॅम्परिंग'नंतर स्मिथ-वॉर्नर मायदेशात खेळण्यास सज्ज

वॉर्नर आणि स्मिथ

 'बॉल टॅम्परिंग प्रकरणात दोषी आढळल्यानंतर १ वर्ष क्रिकेटपासून दूर राहिलेले स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर ही जोड तब्बल तीन वर्षानंतर मायदेशात आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी क्रिकेटच्या मैदानात उतरणार आहेत. २७ ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्या टी-२० मालिकेला सुरुवात होत आहे. तब्बल तीन वर्षानंतर वॉर्नर-स्मिथ मायदेशातील मैदानात उतरतील. 

दिवस-रात्र कसोटी सामने खेळण्यासाठी कोहली 'राजी'

दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात चेंडू कुरतडल्याच्या प्रकरणात ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने तत्कालीन कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यावर प्रत्येकी एक-एक वर्षासाठी निलंबन केले होते. इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकात ही जोडी मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. पण श्रीलंकेविरुद्ध पहिल्यांदाच ते मायदेशात सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहेत.   

विजय हजारे चषक : VJD method ने कर्नाटकला ठरवले विजेता

श्रीलंकेविरुद्धचा पहिला सामना दोघांसाठीही महत्त्वपूर्ण असेल. या सामन्यासाठी दोघेही कसून सराव करत आहेत. सामन्यापूर्वी स्मिथ म्हणाला की, टी-२० च्या विश्वचषकात मी भारताविरुद्ध मायदेशात शेवटचा सामना खळलो होतो. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाविरुद्ध आम्हाला पराभव स्वीकारावा लागला होता. पुन्हा संघाचे प्रतिनिधीत्व करणे माझ्यासाठी आनंददायी आहे. खूप दिवसांपासून मी मायदेशात खेळण्याची प्रतिक्षा करत आहे.

डेव्हिड वॉर्नरनेही खेळावर लक्ष्य केंद्रित करत असल्याचे सांगितले. तो म्हणाला की, लोक काय म्हणतील याचा विचार मी अजिबात करत नाही. सकारात्मक मानसिकतेने मैदानात उतरुन संघासाठी चांगली कामगिरी करणे यावरच माझा भर राहिल.