पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ब्राझीलचा स्टार नेयमार 'शतकी' सामना खेळण्यास सज्ज

नेयमार

ब्राझीलचा अव्वल फुटबॉलपटू नेयमार कारकिर्दीतील शंभरावा सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. सिन्हुआ वृत्तसंस्थेनुसार, नेयमार सध्याच्या घडीला पॅरिस सेंट जर्मने क्लब (पीएसजी) कडून खेळत आहे. नुकताच नेयमारने स्पेनच्या बार्सिलोना क्लबच्या ताफ्यास पुन्हा सामील होण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. नेयमारच्या या अयशस्वी प्रयत्नानंतर पीएसजीच्या समर्थकांनी त्याला ट्रोल देखील केले होते. 

IND vs SA 2nd test Day 1 : पहिल्या दिवसाअखेर भारत ३ बाद २७३ धावा

ब्राझीलचा संघ सेनेगल विरुद्ध मैत्रीपूर्ण सामना खेळणार आहे. सामन्यापूर्वी मी राष्ट्रीय संघ आणि क्लबसोबत आनंदी असल्याची प्रतिक्रिया नेयमारने दिली आहे.  नेयमार ब्राझीलकडून सर्वाधिक गोल करणारा फुटबॉलपटू आहे. त्याने ९९ सामन्यात ब्राझीलचे प्रतिनिधीत्व करताना ६१ गोल डागले आहेत. ब्राझीलसाठी शतकी सामना खेळणे आनंददायी असल्याचेही त्याने म्हटले आहे.

मागील दहा वर्षांत सेहवागनंतर असा पराक्रम करणारा मंयक दुसरा सलामीवीर

खेळाडूच्या आयुष्यात फक्त विजय महत्त्वाचा नसतो. निराशा, पराभव आणि चुका यादेखील आयुष्याचा एक अविभाज्य घटक असतात. परंतु शेवटपर्यंत लढा देऊन तुम्ही चुका सुधारण्याची संधी असते, अशी भावना त्याने व्यक्त केली. उल्लेखनिय आहे की, ब्राझील आणि सेनेगल दोन्ही संघात गुरुवारी सिंगापूरच्या नॅशनल स्टेडियमवर सामना रंगणार आहेत. त्यानंतर रविवारी ब्राझील आणि नायझीरिया यांच्या मैत्रीपूर्ण सामना रंगणार आहे.