पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

VIDEO : मुंबईकर शार्दुलनं जिंकलं अन् जिंकवलं, विराटही भारावला

शार्दुल ठाकूरने मोजकी पण महत्त्वपूर्ण खेळी केली

कटकच्या मैदानात रंगलेल्या निर्णायक सामन्यात मुंबईकर शार्दुल ठाकूरने अल्प पण मोलाचं योगदान दिलं. रोहित शर्मा, लोकेश राहुल, रविंद्र जडेजा आणि विराट कोहलीच्या खेळी त्याच्यामुळेच सार्थ ठरली, म्हटल्यास वावगे ठरणार नाही.  मोक्याच्या क्षणी किमो पॉलचा एक चेंडू विराटच्या बॅटची कड घेईन स्टंम्पवर आदळला अन् सामना विंडीजच्या बाजूनं खुला झाला. 

एका बाजूला रविंद्र जडेजा सेट असला तरी नव्या फलंदाजाला दबावात टाकून विंडीजला सामना आपल्या बाजूने वळवण्याची संधी आली होती. शार्दुल ठाकूर विंडीज माऱ्याला कसा थोपवणार का? असा प्रश्नही काही क्रिकेट चाहत्यांना पडला असेल पण आयपीएलमध्ये त्याची फलंदाजी ज्याने पाहिली होती तो मात्र टेन्शन फ्रिच असावा. आणि झालेही अगदी तसेच.
विराटची जागा घेण्यासाठी मैदानात आलेल्या शार्दुलने किमो पॉलला चौकार खेचत खाते उघडले अन् आपल्या भात्यात विजयी खेचून नेण्याची झलक दाखवून दिली.

#INDvWI : वर्षाअखेरच्या मालिकेचा विजयी शेवट!

एवढ्यावरच तो थांबला नाही तरभारताच्या डावातील ४८ व्या षटकातील कॉट्रिएलच्या तिसऱ्या चेंडूवर त्याने ६४ मीटर अंतरावर षटकार खेचत भारताचा विजय सहज सोपा असल्याचे संकेत दिले. त्यापाठोपाठ त्याने चौकारही ठोकला. शार्दुलच्या या फंलदाजीचा ड्रेसिंगरुममध्ये विराटनेही चांगलाच आनंद घेतल्याचे पाहायला मिळाले. 

शार्दुलच्या विंडीजविरुद्धच्या महत्त्वपूर्ण खेळीनंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. ट्रॅव्हलिंग खर्च आवाक्यात रहावा म्हणून लोकलमध्ये उभे राहून प्रॅक्टिस करणाऱ्या शार्दुल ठाकूरने जडेजासोबत उभे राहून भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला, अशी प्रतिक्रिया एका नेटकऱ्याने दिली आहे. त्याने शार्दुल ठाकूरचा लोकलमधून प्रवास करतानाचा एक फोटोही शेअर केलाय. शार्दुलच्या खेळीनंतर अनेक प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळत आहे.    

INDvsWI: होपला तंबूत धाडत शमीनं घातली विक्रमाला गवसणी

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: standing in local trains to save travels expenses to standing with Jadeja on field to save the match for his country reaction on Shardul thakur Spirit