पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

यॉर्कर स्पेशलिस्ट मलिंगा निवृत्त होतोय!

लासिथ मलिंगा

श्रीलंकेचा अनुभवी जलदगती गोलंदाज लासिथ मलिंगा बांगलादेश विरुद्ध शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. बांगलादेश विरुद्धच्या मालिकेतील पहिल्या सामन्यानंतर निवृत्ती घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. श्रीलंकेचा कर्णधार दिमुथ करुणारत्ने यांना सोमवारी याबाबत माहिती दिली.  

बांगलादेश विरुद्धच्या मालिकेसाठी निवडलेल्या २२ सदस्यीय संघात मलिंगाला स्थान देण्यात आले आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेतील पहिल्याच सामना हा मलिंगाचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील शेवटचा सामना असल्याचे करुणारत्ने म्हणाला. २६ तारखेला कोलंबोतील प्रेमदासा स्टेडीयमवर मलिंगा एकदिवसीय क्रिकेटला अलविदा करेल.  

तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यातच मलिंगा खेळणार असल्याची माहिती करुणारत्नेनं पत्रकार परिषदेमध्ये दिली. करुणारत्ने म्हणाला की, निवड समिती आणि मलिंगा यांच्यात याबाबत काय चर्चा झाली याबद्दल मला कोणतीही कल्पना नाही. पण मालिकेतील पहिला सामन्यातच मलिंगा निवृत्ती घेणार आहे. मलिंगाने आतापर्यंत २२५ सामन्यात श्रीलंकेचे प्रतिनिधीत्व केले आहे. यात त्याने ३३५ बळी मिळवले आहेत. ३८ धावांत ६ बळी ही त्याची सर्वश्रेष्ठ कामगिरी आहे.

आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दित त्याने तब्बल ११ वेळा एका सामन्यात चार विकेट्स मिळवण्याचा पराक्रम केला आहे. तर ८ वेळा पाच किंवा त्यापेक्षा अधिक गडी बाद केले आहेत.