पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

श्रीलंका संघातील सिनिअर्सचा पाकिस्तानला जाण्यास नकार

लसिथ मलिंगा

श्रीलंकन क्रिकेट संघातील बहुतांश वरिष्ठ खेळाडुंनी पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाण्यास नकार दिला आहे. श्रीलंकेला सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पाकिस्तानच्या दौऱ्यात मर्यादित षटकांची मालिका खेळायची आहे. वनडे टीमचा कर्णधार दिमुथ करुणारत्ने, टी-२० चा कर्णधार लसिथ मलिंगा आणि माजी कर्णधार अँजेलो मॅथ्यूजसारख्या वरिष्ठ खेळाडुंनी पाकिस्तान दौऱ्यावर जाण्यास नकार दिला आहे. 

'थ्रीडी गॉगल'च्या ट्विटचा पश्चाताप नाही : रायडू

श्रीलंकेचे क्रीडा मंत्री हेरिन फर्नांडो म्हणाले की, बहुतांश खेळाडुंच्या कुटुंबीयांनी सुरक्षेवरुन आपली चिंता व्यक्त केली आहे. टीमचे अधिकारी खेळाडुंशी चर्चा करतील. पाक दौऱ्यात त्यांना योग्य ती सुरक्षा दिली जाईल हेही सांगतील. याबाबत ९ सप्टेंबरला एक बैठक होण्याची अपेक्षा आहे. 

फर्नांडो म्हणाले की, काही खेळाडूंनी माझ्याशी याबाबत चर्चा केली. पाकमधील सुरक्षेबाबत कुटुंबीयांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे आम्ही या दौऱ्यात सहभागी होणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. खेळाडूंबरोबर मीही पाक दौऱ्यावर येण्यास तयार असल्याचे त्यांना सांगितले आहे. 

केदार जाधवने घेतले श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन

पाक आणि श्रीलंका कराची येथीन नॅशनल स्टेडिअमवर २७ सप्टेंबर, २९ सप्टेंबर आणि २ ऑक्टोबरला तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. त्यानंतर दोन्ही संघ लाहोरमधील गदाफी स्टेडिअमवर ५, ७ आणि ९ ऑक्टोबरला तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळेल. त्यानंतर श्रीलंका डिसेंबरमध्ये दोन सामन्यांची कसोटी विश्व चॅम्पियनशीप मालिका खेळेल.

शेन वॉर्नने सांगितले, स्मिथ आणि विराटमध्ये कोण आहे सरस ?

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:sri lankan senior cricketers malinga mathews karunaratne refuse to play in pakistan due to security concerns