भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसरा आणि अखेरचा टी-२० सामना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पुण्यातील मैदानात खेळवण्यात येणार आहे. पुण्याच्या मैदानातील हा तिसरा आंतरराष्ट्रीय टी-२० सामना आहे. २० डिसेंबर २०१२ मध्ये पुण्याच्या मैदानात भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध पहिला टी-२० सामना खेळला होता. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने या सामन्यात इयॉन मोर्गनच्या नेतृत्वाखालील संघाला ५ गडी राखून पराभूत केले होते. या सामन्यात इंग्लंडने प्रथम फंलदाजी करताना निर्धारित २० षटकात १५७ धावा केल्या होत्या. इंग्लंडकडून हेल्सने अर्धशतकी खेळी होती. टीम इंडियाकडून एकाही फलंदाजाला अर्धशतक पूर्ण करता आले नसले तरी भारताने सामना १३ चेंडू राखून खिशात घातला होता. भारताकडून युवराज सिंगने २१ चेंडूत ३८ धावांची केलेली खेळी ही सर्वोच्च ठरली होती.
Video : डोळ्याचं पारण फेडणारा हा झेल नक्की पाहा
पुण्याच्या मैदानावर यापूर्वी भारत आणि श्रीलंका यांच्यातच अखेरचा आंतरराष्ट्रीय टी-२० सामना खेळवण्यात आला आहे. या सामन्यात श्रीलंकन संघाने भारताला पराभवाचा धक्का दिला होता. महेंद्र सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ या सामन्यात निर्धारित २० षटके देखील खेळू शकला नव्हता. श्रीलंकन गोलंदाजांनी भारताचा डाव हा १८. ५ षटकात १०१ धावांत आटोपला होता. कसून रजिथा दुशन शनाका या जोडीने प्रत्येकी ३ तर चमिरा २ आणि शनायकेने १ बळी टीपला होता. धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या श्रीलंकेने १८ व्या षटकात विजयावर शिक्कामोर्तब केला होता. श्रीलंकेकडून कर्णधार दिनेश चंडिमलने सर्वाधिक ३५ धावांची खेळी केली होती.
MS धोनी वनडे क्रिकेटला रामराम करेल, शास्त्रींनी वर्तवला अंदाज
श्रीलंकेकडून मागील पराभवाचा वचपा काढून मालिका खिशात घालण्याच्या इराद्यानेच भारतीय संघ मैदानात उतरेल. दुसरीकडे मलिंगाच्या नेतृत्वाखालील श्रीलंकन संघ पुण्यातील पुनरावृत्ती पुन्हा करत मालिका बरोबरी साधण्यास प्रयत्नशील असेल. पुण्यात रंगलेल्या इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात विराट हा भारतीय संघासोबत होता मात्र श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात तो भारतीय ताफ्यात नव्हता. यावेळी विराट भारतीय संघाचा कर्णधार आहे आणि तो चांगल्या फॉर्ममध्ये असल्यामुळे श्रीलंकेसाठी पुण्यातील मैदानातील मागील पुनरावृत्ती करणे सहज सोपे असणार नाही.