इंदूरच्या होळकर मैदानात भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी-२० सामना रंगणार आहे. या सामन्यातील विजयासह तीन सामन्यांच्या मालिकेत आघाडी घेण्याच्या इराद्याने दोन्ही संघ प्रयत्नशील असतील. दोन्ही संघाच्या मागील वर्षातील कामगिरीची तुलना केली तर भारतीय संघ श्रीलंकेच्या कित्येक पटीने भारी आहे. मोजके क्षण वगळता क्रिकेट जगतात भारतीय संघाने आपला दबदबा ठेवल्याचे पाहायला मिळाले. कामगिरीत सातत्य राखून क्रिकेट चाहत्यांचा आनंद द्विगुणित करण्याचे आव्हान घेऊन विराट सेना मैदानात उतरेल.
VIDEO: नव्या आव्हानांची शमी अशी करतोय तयारी
इंदूरच्या अहिल्याबाई होळकर क्रिकेट मैदानावर २००६ पासून भारतीय संघाने एकही सामना गमावलेला नाही. अर्थात होळकवरच्या मैदान हे भारतीय संघासाठी विजयाचे नंदनवन आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. २००६ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात भारताने ७ गडी राखून विजय मिळवला होता. त्यानंतर २००८ मध्ये भारतीय संघाने एकदिवसीय सामन्यात पुन्हा एकदा इंग्लंडला ५४ धावांनी पराभवाचा दणका दिला होता.
IndvsSL: टीम इंडिया इंदुरच्या मैदानातील विजयी इतिहास कायम राखणार?
२०११ मध्ये टीम इंडियाने वेस्ट इंडिजला तब्बल १५३ धावांनी धुव्वा उडवला. २०१५ मध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेला २२ धावांनी पराभूत केले होते. या मैदानात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियालाही सोडले नाही. २०१७ मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५ गडी राखून पराभूत केले. २२ डिसेंबर २०१७ मध्ये भारताने टी-२० मध्ये श्रीलंकेला मात दिली होती. या सामन्यात रोहित शर्माने ४३ चेंडूत ११८ धावांची धमाकेदार खेळी केली होती. भारताने हा सामना ८८ धावांनी खिशात घातला होता. रोहित शर्माने अवघ्या ३५ चेंडूत शतक साजरे केले होते. यावेळी रोहित शर्माला विश्रांती दिल्यामुळे श्रीलंकेला थोडाफार दिलासा मिळेल.