नव्या वर्षातील गुवाहाटीच्या मैदानातील पहिल्या सामन्यावर पावसाने पाणी फेरल्यानंतर भारत आणि श्रीलंका संघ इंदुरमध्ये होणाऱ्या दुसऱ्या सामन्यासाठी सज्ज आहेत. दोन्ही संघ सोमवारी मध्य प्रदेशमधील इंदुरमध्ये दाखल झाले. दोन्ही संघाचे वास्तव्य हे एकाच हॉटेलमध्ये असून अहिल्याबाई होळकर विमानतळावर उतरलेल्या संघातील खेळाडूंना पाहण्यासाठी क्रिकेट चाहत्यांनी या ठिकाणी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत दोन्ही संघ हॉटेलमध्ये पोहचले.
महाराष्ट्र केसरी: गतविजेत्यांना धक्का! नवे गडी फायनलमध्ये भिडणार
तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना रद्द झाल्यामुळे मालिका जिंकण्यासाठी दोन्ही संघाना उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागतील. भारतीय संघाच्या दृष्टिने इंदुरचे होळकर मैदान लाभदायी असेच आहे. या मैदानात भारतीय संघाने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. २७ हजार प्रेक्षकांची क्षमता असलेल्या या मैदानावर २००६ पासून आतापर्यंत दोन कसोटी सामने एक टी-२० सामना आणि पाच एकदिवसीय सामने खेळवण्यात आले आहेत.
हो आफ्रिदी बेस्ट ऑलराउंडर! चोप्रांनी संतप्त चाहत्यांना दिले उत्तर
तिन्ही प्रकारातील एकूण आठ सामन्यात भारतीय संघाने प्रतिस्पर्ध्यांना पराभूत केले आहे. श्रीलंकेविरुद्धचा सामना जिंकून भारतीय संघ या मैदानातील विक्रम आणखी मजबूत करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. पहिल्या सामन्यात ऋषभ पंत ऐवजी संजू सॅमसनला संधी मिळेल अशी शक्यता होती. मात्र विराटने पुन्हा एकदा पंतला पसंती दिल्याचे पाहायाल मिळाले होते. नाणेफेकीनंतर एकाही चेंडूचा खेळ न होता सामना रद्द झाल्यामुळे पहिल्या सामन्यातील संघ कायम राहण्याची शक्यता आहे.
दुसऱ्या सामन्यात असा असू शकेल भारतीय संघ
शिखर धवन, लोकेश राहुल, विराट कोहली (कर्णधार), श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), शिवम दुबे, वाशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, शार्दुल ठाकुर, नवदीप सैनी, जसप्रीत बुमराह