पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Video : पावसानं चाहत्यांना निराश केलं, पण...विराटनं खूश केलं

विराट कोहली

नव्या वर्षातील पहिल्या टी-२० सामन्यात पावसाने बँटींग केल्याचे पाहायला मिळाले. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. मात्र पावसामुळे नियोजित वेळेत खेळ सुरु झाला नसल्याने नव्या वर्षात धावांची बरसात बघण्याची उत्सुकतेने वाट पाहणाऱ्यांच्या पदरी निराशा आली. 

IndvsSL 1st T20I अपडेट्स : खेळ सुरु होण्यापूर्वी गुवाहाटीत पावसाची बॅटींग

दरम्यान सामन्याबाबत कोणताही निर्णय होण्यापूर्वी बीसीसीआयने विराट कोहलीचा मैदानातील एक फोटो शेअर केलाय. पावासाच्या विश्रांतीनंतर विराट कोहली मैदानाची पाहणी करताना पाहायला मिळाले. चाहत्यांप्रमाणेच त्याची इच्छाही सामना खेळावा अशीच दिसते. या सामन्यात एक धाव करुन विराट कोहलीला रोहित शर्माला ओव्हरटेक करण्याची संधी होती. मात्र विराटला यासाठी कदाचित इंदुरच्या मैदानातील सामन्यापर्यंत प्रतिक्षा करावी लागू शकते.   

Video : असं कवा कुणी 'बोल्ड' होतं का राव!

गुवाहाटीमध्ये सरासरी प्रथम फंलदाजी करणाऱ्या संघाची सरासरी धावासंख्या ही १२७ आणि दुसऱ्यांदा फलंदाजी करतानाची सरासरी ही ११८ अशी आहे. इंग्लंडचा महिला संघ आणि भारतीय महिला यांच्यातील सामन्यात या मैदानात सर्वाधिक १६० धावांचा विक्रम आहे. तर भारत आणि ऑस्ट्रेलिया पुरुष गटात ११८ ही सर्वात कमी धावसंख्या आहे. निर्धारित २० षटकाच्या खेळातील ही आकडेवारी आहे.  

पूर्ण माहिती घेतल्याशिवाय सीएएवर बोलणार नाहीः विराट कोहली

सामना होणार की नाही याबाबत संभ्रम दिसत असतानाही गुवाहाटीच्या स्टेडियमवर चाहत्यांच्यातील उत्सुकता कमी झालेली नाही. मोठ्या आशेने चाहते सामना सुरु होण्याची वाट पाहताना दिसत आहेत. पिच पाहणीसाठी आलेल्या कर्णधाराला पाहून प्रेक्षकांच्यात एक जल्लोषाचे वातावरणही पाहायला मिळाले. भारत आणि श्रीलंका यांच्यातील गुवाहाटीच्या सामन्यात नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीच्या मुद्यावरुन सुरु असलेल्या आंदोलनामुळे फटका बसणार असल्याची चर्चा यापूर्वी रंगली होती. हे संकट टळल्यानंतर पावसाने खेळावर पाणी फिरवण्याचे काम केल्याचे दिसून आले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Sri Lanka tour of India 2020 Virat Kohali Lead India vs Lasith Malinga Sri Lanka 1st T20I At Guwahati Rain Live Score Final Result And Record