पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

...म्हणून गुवाहाटीत दाखल श्रीलंकन टीमभोवती दिसली कडेकोट सुरक्षा

लसिथ मलिंगाच्या नेतृत्वाखालील श्रीलंकन संघ गुवाहाटीत दाखल

नव्या वर्षातील पहिल्या टी-२० मालिकेसाठी श्रीलंकन संघ गुवाहाटीमध्ये दाखल झाला आहे. लसिथ मलिंगाच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेचा संघ भारताविरुद्ध तीन सामन्यांची मालिका खेळणार आहे. रविवारी ५ जानेवारीला मालिकेतील सलामीचा सामना गुवाहाटीच्या मैदानात रंगणार आहे. 
गुरुवारी कडेकोट बंदोबस्तात श्रीलंकन संघाचे गुवाहाटीमध्ये आगमन झाले. सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात देशभरात संतप्त वातावरण आहे. गुवाहाटीमध्ये देखील याचे पडसाद पाहायला मिळाले होते.

सचिनच्या कौतुकानंतर 'त्या' दिव्यांग मुलानं व्यक्त केल्या मनातील भावना

त्यामुळे श्रीलंकन संघाला अतिरिक्त सुरक्षा पुरवण्यात आली होती. श्रीलंकेचा संघाभोवती गुवाहाटी विमानतळावरुन हॉटेलपर्यंत सुरक्षाकडे पाहायला मिळाले. आसाम क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार,  दोन्ही संघासाठी पर्यायी सराव सत्राची व्यवस्था करण्यात आली आहे. श्रीलंकेचा संघ दिवसाच्या तर भारतीय संघ संध्याकाळच्या सत्रात सराव करणार आहे.  

या पाच दिग्गज क्रिकेटर्सच्या नावे लाजिरवाण्या विक्रमाची नोंद

डिसेंबरमध्ये आसाममध्ये सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात आंदोलन पेटले होते. या आंदोलनामुळे रणजी आणि १९ वर्षाखालील सामने रद्द करण्याची वेळ आली होती. एवढेच नाही तर  आसाममधील आंदोलनानंतर भारत-श्रीलंका यांच्यातील गुवाहाटीमध्ये नियोजित पहिला टी-२० सामना रद्द होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली होती. आसाम क्रिकेट असोसिएशनचे सचिव देवजीत सैकिया म्हणाले की, सध्या राज्यातील परिस्थीती सामन्य आहे. राज्यातील इतर शहरांप्रमाणे गुवाहाटी देखील सुरक्षित आहे.

 

WWE 24*7 चॅम्पियनशिप : काही क्षणाचा चॅम्पियन!

भारतीय संघाने विंडीज विरुद्धच्या मालिका जिंकत २०१९ चा शेवट गोड केला होता. नव्या वर्षात याच जोमाने टीम इंडिया मैदानात उतरण्यास सज्ज असेल. दुसरीकडे सलामीच्या सामन्यात भारतीय संघाने विंडीज विरुद्धच्या मालिका जिंकत २०१९ चा शेवट गोड केला होता. नव्या वर्षात विजयाचे सातत्य कायम राखण्याच्या इराद्याने टीम इंडिया मैदानात उतरण्यास सज्ज असेल. दुसरीकडे सलामीच्या सामन्यात दमदार कामगिरीकरुन भारताला तगडे आव्हान देण्याची श्रीलंकन संघासमोर कसोटी असेल. आगामी टी-२० विश्वचषकाच्या दृष्टिने दोन्ही संघासाठी ही मालिका महत्त्वपूर्ण ठरेल.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: Sri Lanka tour of India 2020 ind vs sl 1st t20 international match in guwahati barsapara stadium sri lanka cricket team reached guwahati amid thick security cover lasith malinga virat kohli