पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

टी-२० मालिकेत वॉर्नरला बाद करणं लंकेला जमलं नाही

डेव्हिड वॉर्नर

ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या टी-२० सामन्यात पाहुण्या श्रीलंकेला ७ गडी राखून पराभूत करत मालिका ३-० अशी खिशात घातली. पहिल्या दोन सामन्यात नाबाद राहिला वार्नरने तिसऱ्या सामन्यातही नाबाद अर्धशतक झळकावत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. मेलबर्नच्या मैदानात रंगलेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात श्रीलंकने ६ बाद १४२ धावा केल्या होत्या. वॉर्नरच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ७ गडी आणि २.२ षटके राखून हे आव्हान सहज परतून लावले. डेव्हिड वॉर्नरने सलामीच्या सामन्यात नाबाद शतक ठोकले होते. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात त्याने नाबाद ६० धावांची खेळी केली. तिसऱ्या सामन्यातही त्याने नाबाद ५७ धावांची खेळी साकारली.

बीसीसीआयच्या निर्णयावर दिया मिर्झाचा संतप्त सवाल

प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या श्रीलंकेची सुरुवात खराब झाली. स्टार्कने डावीतील पहिल्या षटकातील अखेरच्या चेंडूवर सलामीवीर डिक्वेलाला तंबूत धाडले. तो खातेही उघडू शकला नाही. सलामीवीर कुशल मेंडीस आणि कुशल परेरा ही जोडी सेट होत असल्याचे दिसत असताना केन रिचर्डसनने मेंडीसला १३ धावांवर चालते केले. अविष्का फर्नांडो (२०) ओशदा फर्नांडो (६), शहान जयसूर्या (१२) हे फलंदाज मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरले असताना कर्णधार परेराने ४५ चेंडूत ४ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ५७ धावांची खेळी केली. राजपक्षा १८ आणि मलिंगा ८ धावांवर नाबाद राहिले. त्यांनी अखेरच्या षटकात केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर लंकेच्या संघाने निर्धारित २० षटकात ६ बाद १४२ धावांपर्यंत मजल मारली. 

मॅक्सवेलशिवाय या खेळाडूंना करावा लागला डिप्रेशनचा सामना

ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार फिंच (३७), स्टीव्ह स्मिथ १३,  बेन मॅक (५) धावा करुन परतल्यानंतर वॉर्नरने ५० चेंडूत ४ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद ५७ धावांची खेळी करत ऑस्ट्रेलियाचा विजय सुकर केला. दुसऱ्या बाजूला १५ चेंडूत २२ धावांची खेळी करत टर्नरने त्याला उत्तम साथ दिली. 
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: Sri Lanka tour of Australia 2019 Australia vs Sri Lanka 3rd T20I Australia won by 7 wkts David Warner Again playint not out Innings