श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या बांगलादेश संघाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात मलिंगा आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील आपला अखेरचा वनडेत सामना खेळला. यॉर्कर स्पेशलिस्ट लसिथ मलिंगाने या सामन्यात लक्षवेधी कामगिरी करत शेवट गोड केला.
कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर मलिंगाने आपल्या निरोपाच्या सामन्यात ३८ धावा खर्च करुन तीन गड्यांना तंबूचा रस्ता दाखवला. मलिंगाच्या कामगिरीच्या जोरावर श्रीलंकाने हा सामना ९१ धावांनी जिंकला. या सामन्यात मलिंगाने बांगलादेशच्या तमिम इक्बालला ज्या पद्धतीने बाद केले, ते पाहण्याजोगे होते.
याव्यतिरिक्त मलिंगाने सौम्या सरकार आणि मुस्तफिझुर रहमान यांना चालते केले.
तमिम आणि सरकार यांना मिलिंगाने जाता जाता आपल्या यॉर्करची झलक दाखवली. तमिमला त्याने खातेही उघडू दिले नाही. मलिंगाने त्याला टाकलेला चेंडू इतका अप्रतिम होता की, तमिमने या चेंडूवर अक्षरश: गुडघे टेकले.