पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रोहित, बुमराहचा मलिंगाला भावूक संदेश

श्रीलंकन खेळाडूंनी मलिंगाला खास अंदाजात दिला निरोप

श्रीलंकेचा जलदगती गोलंदाज लसिथ मलिंगाने गुरुवारी बांगलादेश विरुद्ध आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला. मलिंगाच्या निवृत्तीनंतर अनेक दिग्गजांनी त्याला आतापर्यंतच्या कारकिर्दीतील कामगिरीचे कौतुक करत आगामी काळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. यात भारताचा उपकर्णधार रोहित शर्मा आणि बुमराहने खास शुभेच्छा दिल्या.  
 

मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातील मलिंगाचा सहकारी आणि कर्णधार रोहितने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या निवृत्तीवर प्रतिक्रिया दिली आहे. त्याने  लिहिलंय की, मलिंगा हा भरवशाचा आणि सामन्याला कलाटणी देणारा गोलंदाज आहे. जर मला मुंबई इंडियन्ससाठी मागील दशकातील एक मॅच विनर निवडायचा असेल तर मलिंगाचे नाव अव्वलस्थानी असेल.  तणावाच्या परिस्थितीत योग्य गोलंदाजी करुन कर्णधाराचा विश्वास तो सार्थ ठरवायचा, अशा शब्दांत रोहितनं कौतुक केले आहे. 

 

Video : मलिंगासमोर 'शेर ए बांगला'च्या कर्णधाराने टेकले गुडघे!

बुमराहने मलिंगाला मार्गदर्शक असल्याचे सांगत त्याला भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तुमच्या गोलंदाजीतून खूप काही शिकलो आणि पुढेही शिकत राहिन, अशी प्रतिक्रिया बुमराहने दिली आहे. मास्टर ब्लास्टर सचिनने मलिंगाच्या कारकिर्दी कौतुकास्पद असल्याचे म्हटले आहे.  एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन वेळा हॅटट्रिक घेणारा मलिंगा एकमेव गोलंदाज आहे. या प्रकारातील २२६ सामन्यात त्याने ३३८ बळी मिळवले आहेत. २००४ मध्ये एकदिवसीय सामन्यात पदार्पण करणाऱ्या मलिंगाने घरच्या मैदानावर निवृत्ती घेतली.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: sri lanka lasith malinga bangladesh national cricket team lasith malinga last odi match rohit sharma jasprit bumrah sachin tendulkar reactions