पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'पाक दौऱ्यातून माघार घेणाऱ्या खेळाडूंवर कारवाई व्हायला हवी'

पाकिस्तान क्रिकेटर जावेद मियादांद

पाकिस्तान दौऱ्यातून काढता पाय घेणाऱ्या आपल्या खेळाडूंवर श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने कारवाई करायला हवी, असे मत पाकिस्तानचे माजी कर्णधार जावेद मियादांद यांनी व्यक्त केले आहे. २७ सप्टेंबरपासून श्रीलंकन क्रिकेट संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव संघातील अनेक खेळाडूंनी दौऱ्यातून आपले नाव माघारी घेतले आहे.

 BCCI ने दिनेश कार्तिकला माफ केलं!

पाकिस्तानमधील 'द डॉन' च्या वृत्तानुसार मियादांद म्हणाले की, श्रीलंकेचा कोणता संघ पाक दौऱ्यावर येतो याचा फारसा फरक पडणार नाही. पाकिस्तानने या दौऱ्यात आपली सर्वोच्च कामगिरी करणे अपेक्षित आहे. मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटकडे दुर्लक्ष करुन अन्य देशात टी-२० खेळण्यास प्राधान्य देणाऱ्या खेळाडूंवर श्रीलंका बोर्डाने कारवाई करायला हवी. पण मियादांद यांच्या वक्तव्याला श्रीलंकन बोर्ड दाद देईल, असे वाटत नाही. याचे कारण यापूर्वी श्रीलंकन क्रीडा मंत्र्यांनी आपल्या खेळाडूंच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट केले होते.  

 

Ashes 2019:.. म्हणून पराभवानंतरही ऑसी कर्णधाराला संघाचा अभिमान

श्रीलंकन संघ पाकिस्तान दौऱ्यावर तीन टी-२० सामन्यांसह तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्यातून श्रीलंकेचा टी-२० कर्णधार लसिथ मलिंगा, अँजेलो मँथ्यूज, दिनेश चंडीमल, सुरंगा लकमल, दिमुथ करुणारत्ने, थिसारा परेरा, अकीला धनंजय, धनंजय डी सिल्वा, कुशल परेरा आणि निरोशन डिकवेला या दिग्गज खेळाडूंनी माघार घेतली आहे.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:sri lanka cricket un khiladiyon ke khilaf action le jo pak daure par nahi jaa rahe hain javed miandad