पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोना : श्रीलंकन क्रिकेट बोर्डाकडून सरकारला कोट्यवधीची मदत

श्रीलंकन बोर्डाकडून सरकारला आर्थिक मदत

श्रीलंका क्रिकेट मंडळाने कोरोना विषाणूशी लढा देण्यासाठी आपल्या सरकारला अडीच कोटींची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने अधिकत वेबसाईटवरुन यासंदर्भातील माहिती दिली. आर्थिक मदतीशिवाय अन्य स्वरुपातही मदत करण्याची तयारी बोर्डाने दर्शवली आहे.  

रैनाच्या घरी नवा पाहुणा!

पुढील आदेशापर्यंत देशांतर्गत सामने स्थगित करण्याचा निर्णय श्रीलंका क्रिकेट बोर्डाने घेतलाय. खेळाडूंनी विनाकारण घराबाहेर पडू नये, अशा सूचना देखील त्यांनी संघाला दिल्या आहेत. सरकारला सहकार्य करुन आपण कोरोनाला पराभूत करायचे आहे अशा आशयाचे संदेश क्रिकेटर्स सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना देत आहेत.   

कोरोनाशी लढताना धर्मापलिकडे जाऊन विचार करा : अख्तर

बोर्डने आपले शेअरधारक, क्लब सदस्य, जिल्हा आणि प्रांतिय संघाना सुरक्षिततेसंदर्भात खबरदारीच्या सूचनाचे पालन करण्यास सांगितले आहे. श्रीलंकेच्या राष्ट्रपतींनी ट्विटच्या माध्यमातून श्रीलंकन बोर्डाचे आभार मानले आहेत.