पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

श्रीसंतला मोठा दिलासा, आजीवन बंदी रद्द करून ७ वर्षे केली

श्रीसंत

स्पॉट फिक्सिंग प्रकरणात आरोप झालेला क्रिकेटपटू एस श्रीसंत याला काहीसा दिलासा मिळाला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे लोकपाल डी के जैन यांनी मंगळवारी म्हटले आहे की, या प्रकरणात श्रीसंतवर घालण्यात आलेली बंदी पुढल्या वर्षी संपुष्टात येईल. गेल्या सहा वर्षांपासून बंदीमुळे श्रीसंत आपल्या क्रिकेट कारकीर्दीतील महत्त्वाची वर्षे गमावून बसला आहे. स्पॉट फिक्सिंग प्रकरणात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने श्रीसंतवर ऑगस्ट २०१३ मध्ये बंदी घातली होती.

पी. चिदंबरम यांचा अटकपूर्व जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला

श्रीसंत याच्यासोबतच या प्रकरणात राजस्थान रॉयल्सचे अजित चंदिला आणि अंकीत चव्हाण या क्रिकेटपटूंवरही बंदी घालण्यात आली होती. बीसीसीआयच्या अनुशासन समितीचा निर्णय यावर्षी १५ मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयाने बदलला होता. ७ ऑगस्ट रोजी आपल्या निर्णयामध्ये डी के जैन यांनी म्हटले आहे की, घालण्यात आलेली बंदी सात वर्षांची असेल आणि पुढल्या वर्षीपासून हे क्रिकेटपटू खेळण्यासाठी मुक्त असतील.

डी के जैन म्हणाले, श्रीसंत याचे वय ३५ वर्षांपेक्षा जास्त आहे. क्रिकेटपटू म्हणून त्याच्या आयुष्यातील महत्त्वाची वर्षे आता सरली आहेत. त्यामुळे १३ सप्टेंबर २०१३ पासून सात वर्षांसाठी या क्रिकेटपटूंवर बंदी घालणे योग्य राहिल. आजीवन बंदीची गरज नाही.

ईडी कार्यालयाबाहेर येऊ नये; राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांनी आवाहन

या वर्षी २८ फेब्रुवारी रोजी बीसीसीआयने न्यायालयात सांगितले होते की या क्रिकेटपटूंवर घालण्यात आलेली आजीवन बंदीच योग्य आहे. या क्रिकेटपटूंनी सामन्यांच्या निर्णयावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला होता.