पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

होय, मी समलैंगिक; भारतीय धावपटू दुती चंदचा खुलासा

धावपटू दुती चंद (AFP)

भारताची स्टार धावपटू आणि १०० मीटर शर्यतीत राष्ट्रीय विक्रम नोंदवणाऱ्या दुती चंदने आपल्या जीवनसाथीच्या नावाचा खुलासा केला आहे. आशियाई खेळात रौप्य पदक मिळवणाऱ्या दुतीने आपल्याच शहरातील एका महिलेबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याचे सांगितले आहे. दुती ही ओडिशातील चाका गोपालपूर गावातील रहिवासी आहे. दुतीने इंग्रजी वृत्तपत्र 'द इंडियन एक्सप्रेस'ला दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला. मी माझी जोडीदार निवडली आहे. मला वाटते प्रत्येकाला आपला जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य हवे, असे तिने म्हटले. 

...म्हणून 'गब्बर'ने नॉनव्हेज सोडले!

२३ वर्षीय धावपटू दुतीने म्हटले की, मी नेहमी समलैंगिक लोकांना पाठिंबा दिला आहे. ही प्रत्येकाची व्यक्तिगत आवड आहे. सध्या माझे लक्ष्य हे आगामी विश्वचषक आणि ऑलिम्पिक खेळांवर आहे. पण मी तिच्याबरोबरच स्थिरस्थावर होणार आहे. 

आपला सचिन बदलला नाही, ICC च्या 'त्या' ट्विटला क्युट रिप्लाय

मागीलवर्षी सर्वोच्च न्यायालयाने कलम ३७७ हा गुन्हा नसल्याचा निर्वाळा दिल्यानंतर मला माझ्या संबंधांबाबत खुलेपणाने बोलण्याचा विश्वास प्राप्त झाला, असे दुतीने म्हटले. एक खेळाडू म्हणून कोणालाही माझ्याबाबत मत बनवण्याचा अधिकार नाही. कारण हा माझा निर्णय आहे आणि मी ज्याच्याबरोबर मी राहू इच्छिते, त्याच्याबरोबर आहे. हा एक अत्यंत व्यक्तिगत निर्णय आहे. त्याच प्रत्येकाने सन्मान केला पाहिजे, असेही तिने म्हटले. 

भज्जीने इंस्टावरुन सांगितली वॉटसनच्या रक्तबंबाळ इनिंगची कहाणी